सोलापुरात बलात्काराचे दोन गुन्हे दाखल | पुढारी

सोलापुरात बलात्काराचे दोन गुन्हे दाखल

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा :  सोलापूरात बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले असून पहिल्या गुन्ह्यात पती-पत्नीवर तर दुसर्‍या गुन्ह्यात एका व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला. पहिल्या घटनेत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने बलात्कार केला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादी वरून अजय मोहन गायकवाड (वय 32) व त्याची पत्नी हर्षदा अजय गायकवाड (वय 26) दोघे (रा. हत्तुरेवस्ती) या दोघांविरूध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी अजय हा फिर्यादीच्या आईचा मित्र होता. त्यामुळे त्याचे त्यांच्या घरात येणे-जाणे होते.

त्यानंतर अजय हा त्या पीडित मुलीच्या घरात गेल्यानंतर माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघे लग्न करू, मी तुझ्या घरच्यांना तयार करतो. असे बोलून तिच्या घरातच त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही गोष्ट अजयची पत्नी हर्षदा हिला समजल्यानंतर हर्षदाने देखील, तू त्यांच्याबरोबर चांगले रहा, त्यांच्या मनाप्रमाणे वाग असे सांगितले. यातील पीडिता व अजय हे दोघे व्हॉटस् अ‍ॅप व इन्स्ट्राग्रामवर चॅटिंग करहत होते. ते पाहून एका नातेवाईक मुलीने पीडितेच्या आईसमोर प्रश्न उपस्थित केल्याने ही बाब उघडकीस आली. या तिघांची स्टोरी व फोटोज इन्स्ट्राग्रामवर टाकत होते. या वरून अजय व त्याची पत्नी हर्षदा या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी हे करित आहेत.

बलात्काराच्या दुसर्‍या घटनेत ब्युटिशिएनची नोकरी करणार्‍या व एमबीए शिक्षण झालेल्या 26 वर्षांच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यात पीडित मुलीच्या फिर्यादी वरून वसीम नबीलाल शेख (वय 36 रा. कुमठे ता. उत्तर सोलापूर) याच्याविरूध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत आरोपीने त्या ब्युटिशिएनला दारू पाजून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा पुढील तपास सदर बझार पोलिस करित आहेत.

Back to top button