अधिकारी, कर्मचार्‍यांच्या आठवड्याभरात बदल्या | पुढारी

अधिकारी, कर्मचार्‍यांच्या आठवड्याभरात बदल्या

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या येत्या आठवडाभरात होणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी एकाच विभागात काम करणार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. रोड स्वीपर मशिनद्वारे होणार्‍या सफाई कामाचा आढावा घेणार येणार असून जेवढे रस्ते सफाई केली तेवढेच बिल मक्तेदारला दिले जाईल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

बाळे येथील सार्वजनिक शौचालय पाडल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी शौचालय होते त्याच ठिकाणी ते पुन्हा बांधण्यात येईल. संभाजी तलावातील जलपर्णी सध्याच्या ठेकेदाराकडून काढण्यात येईल. सप्टेंबरपूर्वी ड्रेनेजचे काम करुन ड्रेनेजचे तलावात सोडण्यात येणार पाणी बंद करण्यात येईल. त्यानंतर कोल्हापूरच्या ठेकेदाराकडून ऑरगॅनिक पद्धतीने जलपर्णी काढण्यात येणार आहे. कर बिले पाठविण्यास सुरुवात झाली असून आठवडाभरात ऑनलाईन कर भरणा सुरू करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

Back to top button