देवळाली येथे एकाची आत्महत्या | पुढारी

देवळाली येथे एकाची आत्महत्या

करमाळा : पुढारी वृत्तसेवा देवळाली (ता. करमाळा) येथे एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. जगन्नाथ कृष्णा बिचितकर असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. वर्षापूर्वी त्याच्या मुलाने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यांनी शुक्रवारी विषारी औषध केले असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. कर्जबाजारी झाल्यामुळे मुलाने आत्महत्या केली होती. अशी चर्चा आहे. शुक्रवारी साडेपाच- सहा वाजताच्या सुमारास ते औषध प्राशन केल्याचे समजल्यांतर शेतात काम करणार्‍या महिलांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र तेथून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

Back to top button