कर्मचार्‍यांसाठी 17 कोटींचेे अनुदान | पुढारी

कर्मचार्‍यांसाठी 17 कोटींचेे अनुदान

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना थकीत उपदानाची व रजा वेतन अनुदानाची तसेच 7 व्या वेतन आयोगाच्या 3 हप्त्यांची रक्कम देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेला शासनाकडून 17 कोटी रुपये मिळाले आहेत. 2017 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना व थकीत उपदानाची व रजा वेतन अनुदानाची तसेच कायम कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना 7 व्या वेतन आयोगाचे 3 हप्ते मिळावेत ही मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे केली होती.

याबाबत संघटनेनेे बेमुदत काम बंद आंदोलनाची हाक दिली होती. याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक लावली होती. या बैठकीत ना. पवार यांनी सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील 257 नगरपालिकांचे शासनाकडे राहिलेल्या थकीत सहा वेतन अनुदानची 520 कोटी रक्कम अदा करण्यात आली आहे. या शिष्टमंडळामध्ये कामगार नेते नागनाथ तोडकर, जयंत पवार, किशोर खिलारे, धनजी वाघमारे, महावीर कांबळे, नगरअभियंता नेताजी पवार, अभियंता स्वप्निल डोके, केतन बुध्याळ, चेतन चव्हाण, प्रीतम येळे, श्रीशैल्य चाबुकस्वार, विनायक भांगे, उमेश कोटगिरी, अनिल अंभगराव, दिनेश साठे हे उपस्थित होते.

Back to top button