नाशिक : वाहनाची धडक; पादचारी ठार | पुढारी

नाशिक : वाहनाची धडक; पादचारी ठार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव – मनमाड रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना घडली. चोंढी शिवारात नम्रता पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (दि.2) दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस कर्मचारी उमेश पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. डाबली रस्ता ओलांडणार्‍या व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. संबंधिताची ओळख पटलेली नाही. अज्ञात चालकही वाहनासह फरार झाला. हवालदार हिरे हे तपास करित आहेत. दरम्यान, सौंदाणे शिवारात गॅस टँकर (एमएच 46 बीबी 1970) हा पलटी झाल्याप्रकरणी चालक सुभाष यादव (40, रा. जोहनपूर, रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. शनिवारी (दि.4) देवळा फाट्याजवळ हा अपघात झाला होता.

हेही वाचा:

Back to top button