सुभाष जगताप यांना अटकपूर्व जामीन | पुढारी

सुभाष जगताप यांना अटकपूर्व जामीन

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकार्‍याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांना न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

कोल्हापूर : मागणी 500 पासून 45 लाखांची; दीड वर्षात धरपकड 54 जणांची

जगताप तळजाई वसाहत भागातील नागरिकांचे शिधापत्रिकेचे काम घेऊन जुन्या जिल्हा परिषद कार्यालयातील अन्नधान्य वितरण कार्यालयात गेले होते. त्या वेळी पुरवठा निरीक्षक महिला अधिकार्‍याशी त्यांचे वाद झाले होते.

मोदी सरकारचे अनेक निर्णय चुकीचे : सुप्रिया सुळे

यावर ‘सहीसाठी फाईल दिल्यानंतर दोन तासांनीही त्यांनी सही केली नव्हती. काम सोडून त्या मोबाईल चाळत होत्या. जाब विचारल्यानंतर त्यांनी हस्ताक्षरातील फॉर्म हवा, असे सांगितले. हा फॉर्म संकेतस्थळावरून प्रिंट केलेला आहे, असे सांगितल्यानंतरही  त्या ऐकत नव्हत्या. त्यांनी व्हायरल केलेली क्लिप अर्धवट आहेे. मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे,‘ असे जगताप यांनी सांगितले.

Back to top button