आता व्हॉट्सअ‍ॅप होणार अधिक सुरक्षित | पुढारी

आता व्हॉट्सअ‍ॅप होणार अधिक सुरक्षित

न्यूयॉर्क : अनेक अ‍ॅप्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अधिकाधिक सुरक्षित बनवण्यासाठी नवे फीचर्स आणले जात असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपवरील लॉगिन प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठीही दुहेरी पडताळणी कोड वैशिष्ट्यांवर काम सुरू आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अकौंटमध्ये लॉगिन करत असताना सुरक्षा अधिक मजबूत होईल. हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध असेल.

व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचरचा मागोवा घेणार्‍या वेबीटाईंफो या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, या फीचरच्या मदतीने कंपनीला एकापेक्षा अधिक डिव्हाईसवर लॉगिन करण्यापूर्वी त्याच व्हॉट्सअ‍ॅप अकौंटची पडताळणी करावी लागेल. फीचर सुरू केल्यानंतर, जेव्हा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दुसर्‍या डिव्हाईसमध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळी जुन्या डिव्हाईसवर सहा अंकी कोड मिळेल. तुम्हाला तुमच्या नवीन डिव्हाईसवर हा कोड एंटर करणे आवश्यक आहे. कोड जुळल्यानंतरच तुम्ही नवीन डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅपवर लॉगिन करू शकाल. सहा अंकी कोडमुळे सत्यापन प्रक्रिया अधिक मजबूत होईल. जेव्हा तुम्ही नवीन फोनवर व्हॉट्सअ‍ॅपवर लॉगिन करता तेव्हा चॅट लोड करण्यासाठी आणि बॅकअप घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सहा अंकी स्वयंचलित कोड पाठवला जातो. माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबविली
जाते.

Back to top button