प्रियांका गांधींनी फेसबुक पेजवर केले विश्‍वजित कदम यांचे कौतुक | पुढारी

प्रियांका गांधींनी फेसबुक पेजवर केले विश्‍वजित कदम यांचे कौतुक

कडेगाव : शहर प्रतिनिधी

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी दिलेली ऑफर नाकारून  ‘काँग्रेसचा वाघ’ विश्‍वजित कदम यांनी  1 लाख 62 हजार इतके महाराष्ट्राच्या इतिहासातील विक्रमी मताधिक्य घेतले. त्यांना खूप खूप शुभेच्छा’ अशी पोस्ट काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी  यांनी त्यांच्या फेसबुक पेजद्वारे केली आहे. तसेच डॉ. विश्‍वजित कदम यांचे राहुल गांधी यांच्या समवेतचे छायाचित्रही  शेअर केला आहे.

ही  पोस्ट विश्‍वजित कदम यांचे कौतुक करणारी तर आहेच, पण विद्यमान राजकारणावर नेमके भाष्य करणारी ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.  विश्‍वजित कदम यांच्यात राज्याच्या नेतृत्वाची क्षमता आहे. त्यांच्या कामगिरीची दखल दिल्ली दरबारी घेतली जाते.  आगामी काळातील राजकारण कसे असेल याची चुणूक  यानिमित्ताने पाहायला मिळाली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

Back to top button