क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांचे अभिवादन | पुढारी

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जावून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले की, क्रांतीसिंह नाना पाटील यांनी ब्रिटीशांच्या अराजकला, जुलमांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. ते सत्यशोधक विचारांचे होते. त्यांनी सामाजिक सुधारणांचाही आग्रह धरला होता.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी खासदार म्हणून लोकसभेत मराठीचा दमदार आवाज घुमवला. अन्यायाविरोधात करारी आणि वंचिताप्रती कनवाळू , असा त्यांचा बाणा होता. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.

  • हेही वाचलंत का? 

पाहा : …या किल्ल्याची तटबंदी सावरणार कोण?

Back to top button