

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (CBSE) दहावी निकाल आज मंगळवारी जाहीर केला. विद्यार्थी CBSE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in अथवा cbse.gov.in यावर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
तसेच निकालाच्या तीन लिंक्स cbseresults.nic.in या वेबसाईटवर ॲक्टिव्ह करण्यात आल्या आहेत.
यंदा देशभरातील एकूण २ लाख ५८ हजार ७८६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर २ लाख ९६२ विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. ५७ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.
परिक्षेसाठी एकूण २१ लाख ५० हजार ६०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील २० लाख ९७ हजार १२८ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल ९९.०४ टक्के एवढा लागला आहे.
कोरोनामुळे यंदा परीक्षा झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना पुनर्मुल्याकंन करण्यासाठी संधी मिळणार नाही.
जवाहर नवोदय विद्यालय निकाल- ९९.९९ टक्के
केंद्रीय विद्यालय- १०० टक्के
सीटीएसए- १०० टक्के
सरकारी शाळा- ९६.०३ टक्के
सरकारी अनुदानप्राप्त शाळा- ९५.८८ टक्के
खासगी शाळा- ९९.५७ टक्के
यंदाच्या निकालाची टक्केवारी अधिक आहे. दहावीत ९८.८९ टक्के मुले तर ९९.२४ टक्के मुली पास झाल्या आहेत.
बंगळूर -९९.९६ टक्के
चेन्नई-९९.९४
पुणे-९९.९२ टक्के
अजमेर- ९९.८८ टक्के
पंचकुला-९९.७७ टक्के
पाटणा- ९९.६६ टक्के
भुवनेश्वर-९९.६२ टक्के
भोपाळ- ९९.४७ टक्के
चंदीगड- ९९.४६ टक्के
डेहराडून- ९९.२३ टक्के
प्रयागराज- ९९.१९ टक्के
नोएडा- ९८.७८ टक्के
दिल्ली वेस्ट-९८.७४ टक्के
दिल्ली ईस्ट- ९७.८० टक्के
गुवाहाटी- ९०.५० टक्के
हे ही वाचा :