नालशेत येथील पाझर तलावात बुडुन बालकाचा मृत्यू | पुढारी

नालशेत येथील पाझर तलावात बुडुन बालकाचा मृत्यू

पेठ, (नाशिक) पुढारी वृत्तसेवा : पेठ तालुक्यातील नालशेत येथील पहिलीत शिकणारा अजित जितेंद्र पवार (वय-७) हा  आज (दि.) गावाजवळील असलेल्या पाझर तलावावर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेली असता त्याचा पाय घसरून तलावात बुडाला. अधिक खोल पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. पेठ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

Back to top button