जळगाव : ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवत ८ लाखांची फसवणूक | पुढारी

जळगाव : ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवत ८ लाखांची फसवणूक

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकाची ८ लाख ८५ हजारांची ऑनलाईन फसवणूक  (online fraud) करण्‍यात आली. भुसावळ येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की,  देवेंद्र मोतीराम सिडाम (वय ३३ रा. शिवदत्तनगर,भुसावळ ) हे महावितरण कंपनीत सहाय्यक अभियंता आहेत. त्‍यांना  २६ डिसेंबर २०२१ ते १० फेब्रुवारी २०२२ या कालावधीत अनेक अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधला. तसेच गोल्डबार्स यामध्ये ट्रेडिंग केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल, अशी बतावणी संबंधितांनी केली. यावर विश्वास ठेवत देवेंद्र सिडाम यांनी ८ लाख ८५ हजार रुपयांची गुंतवणूक  (online fraud) केली. या गुंतवणुकीवर २५ लाख रुपयांचा नफा झाल्याचा असल्याचेही संबंधित अनोळखींनी फोनवरुन सिडाम यांना सांगितले.

मात्र, प्रत्यक्षात कुठल्याही नफ्याची रक्कम त्‍यांना मिळाली नाही. गुंतवणूक केलेले ८ लाख ८५ हजार रुपये न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.  शनिवारी (दि. २) जळगाव सायबर पोलिसांत त्यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button