भाजप-मनसे युतीसाठी पडले पहिले पाऊल

भाजप मनसे युतीसाठी पडले पहिले पाऊल
भाजप मनसे युतीसाठी पडले पहिले पाऊल
Published on
Updated on

पांडुरंग सांडभोर; पुणे : भाजप-मनसे युतीसाठी पहिले पाऊल पडले आहे. भाजप-मनसे एकत्र येण्यासाठी राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी हे पहिले पाऊल पडले आहे.

भाजप-मनसे युतीबाबत ज्या मुद्यावर या दोन पक्षातील युतीचे घोडे अडले आहे. तो आता निकाली निघण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा 

राज्यात भाजप व सेना यांची युती तुटल्यापासून भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यासाठी आत्ता पर्यंत ठोस पाऊल पडले नव्हते.

गेल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चा झाली. ही नाशिकमध्ये स्टँडींग चर्चा होती.

या भेटीत पाटील यांनी परप्रांतीयाच्या विरोधातील ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे, असे सांगितले होते.

तर ठाकरे यांनीही परप्रांतीयाबद्दलची त्यांची भूमिका नक्की काय हे त्यांनी काही हिंदी न्यूज चॅनेलाला दिलेल्या मुलाखती ऐकल्यानंतर लक्षात येईल, असे सांगितले होते.

तसेच त्या व्हिडिओ क्लिप स्वतः पाटील यांना पाठविण्याचे आश्वासन दिले होते.

अधिक वाचा 

अखेर आठवडाभरानंतर त्या मुलाखतीच्या क्लिप ठाकरे यांनी पाटील यांना पाठविल्या आहेत.

स्वतः पाटील यांनीच ही माहिती दिली. त्यामुळे भाजप मनसे यांच्या युतीसाठी महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. पुढील सहा महिन्यात मुंबईसह १५ महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत.

हे तिन्हीही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन लढल्यास त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची भीती आहे.

त्यातच मनसेची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे आता भाजप- सेना युती तुटल्यानंतर सेनेची कमी भरून काढणे. यासाठी भाजपसाठी मनसे हा सोयीचा पर्याय आहे.

राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका भाजपसाठी आणखी जमेची बाजू ठरणार आहे. पण, केवळ परप्रातियांबद्दलची मनसेची भूमिका भाजपसाठी अडचणीची आहे. मनसेनेही आता त्यांची भूमिका मवाळ केल्याचे चित्र आहे.

किंबहुना हा नक्की विरोध काय हे सांगण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरू आहे. त्यामुळे मनसेला सुद्धा भाजपशी युती हवी हे जवळपास स्पष्ट होत आहे.

राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या मुलाखतीच्या पाठविलेल्या व्हिडीओ क्लिप म्हणजेच युतीसाठी स्वतः हात पुढे करणे असाच त्याचा किमान आतातरी अर्थ म्हणावा लागेल.

नाशिकमध्ये झालेल्या भेटीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची परप्रांतीयाबाबतची भूमिका नक्की काय आहे. यांच्या मुलाखतीच्या व्हिडीओ क्लिप पाठवतो ,असे सांगितले होते. ठाकरे यांनी मला त्या क्लिप पाठवल्या आहेत. त्या मी सर्व ऐकणार आहे.

                                                                   चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

अधिक वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news