अदानी समुहाने विमानतळ मुख्यालय हलविले गुजरातला

अदानी समुहाने विमानतळ मुख्यालय हलविले गुजरातला

Published on

मुंबई, पुढारी ऑनलाईन: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) आपलं मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलविले आहे. अदानी समुहाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात मनसे आणि काँग्रेसने सडकून टीका केली आहे.

अधिक वाचा: 

संकटात सापडलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा ताबा घेतला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा ताबाही अदानींच्या 'एएचएल'कडे गेला आहे.

विमानतळाची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 'एएएचएल'चे मुख्यालय मुंबईत होते. विमानतळाची खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच कंपनीने आपले मुख्यालय अहमदाबादला हलविले आहे.

अधिक वाचा: 

स्थानिक पक्षांमुळे ही वेळ

मुंबईचं महत्त्व मोदींनी नाही तर इथल्या स्थानिक पक्षांच्या कर्माने कमी झालेय. रियल इस्टेटचे अवाजवी भाव कोणाच्या आशीर्वादाने वाढले? इथल्या पायाभूत सुविधा कोणी अडवून ठेवल्यायत?

इथल्या रस्त्यांची ही अवस्था कोणी केली? का नाही उद्योग जाणार अहमदाबाद, बंगलोर आणि हैद्राबादला? असा सवाल करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

अधिक वाचा: 

'केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मुंबईचं महत्त्व जाणीवपूर्वक कमी केलं जात आहे. त्यासाठी येथील उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालयं गुजरातमध्ये नेली जात आहेत.' असे ट्विट केले आहे.

'मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडिया नृत्य बरंच काही सांगून जातं.

मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्रही असंच गुजरातला नेलं गेलं,' असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा:

'महाराष्ट्रानं कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडं होतं.

GVK नं मुंबई विमानतळाचं मुख्यालय आंध्रप्रदेशला नेलं नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवलं नाही,' असा बोचरा टोलाही सावंत यांनी हाणला आहे.

'तुम्ही गरबा दाखवलात तर आम्ही झिंगाट दाखवू'

अंदानी यांनी मुख्यालय स्थलांतर केल्यानंतर मनसेने टीका केली आहे. तुम्ही गरबा दाखवणार असाल तर आम्ही झिंगाट दाखवू असा इशारा मनसेने दिला आहे.

हेही वाचलेत का:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news