पनवेल महानगरपालिका : 50 लोकांना सुरक्षित ठिकाणी हालविले | पुढारी

पनवेल महानगरपालिका : 50 लोकांना सुरक्षित ठिकाणी हालविले

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे  विस्कळित झालेले जनजीवन पुर्ववत करण्यासाठी पनवेल महानगरपालिका चा आपत्तीव्यवस्थापन विभाग रात्रंदिवस कार्यरत असून, सुमारे 150 नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले आहे. पंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा, गरजेच्या वस्तुंचे वाटप आणि वाहतुक व्यवस्था सुरळित राहण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात जवळपास 300  मी. मी. पाऊसाची नोंद झाली आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने काही सखल भागात पाणी साचले त्याचबरोबर नागरिकांच्या  घरात पाणी शिरल्याने सुमारे 150 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांच्या जेवण, अल्पोपहार, पिण्याचे पाणी याची सोय करण्यात आली आहे.

नदी किनारी राहणाऱ्यांना सुरक्षितेबाबत काळजी घेण्याचे आवाहनही आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी केले आहे. याबरोबरच खारघर, कामोठे,तळोजा, कळंबोली आणि पनवेल परिसररातील वाहतुक सुरळित रहावी यासाठी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी  आवश्यक्य त्या सर्व उपाययोजना राबवित आहेत.

पापडीचा पाडा, इकट पाडा ,तळोजा मजकुर, घोट ,पडघे, पेंधर, कळंबोली नोड, तक्का या भागाची सकाळपासून आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी आज(19 जुलै) पहाणी केली. येथील समस्या जाणून घेऊन त्याप्रमाणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिवृष्टी दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी उपायुक्त सचिन पवार , कार्यकारी अभियंता संजय कटेकर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

100 नागरिकांना पालिकेच्या उर्दू शाळेमध्ये स्थलांतरीत

दरम्यान काल (18 जुलै) रात्री पनवेल, कातकरी वाडी येथील 20 कुटूंबांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे स्थलांतर तालुका क्रिडा संकुल याठिकाणी करण्यात आले आहे.

पनवेल येथील भारतनगर, कच्ची मोहल्ला येथे पाणी वाढू लागल्याने येथील नागरीकांना काल रात्री ११.०० ते ११.३० या वेळी सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, स्वच्छता अधिकारी शैलेश गायकवाड यांच्या पथकाने भेटून येथील नागरिकांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलरांतरण करण्यात आले. येथील जवळपास 100 नागरिकांना पालिकेच्या उर्दू शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले .

अशोक बाग, अंकिता  सोसायटी ,डायमंड पार्क येथे पावसाचे पाणी साचले होते या ठिकाणी पंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करण्यात आला.

नवीन पनवेल येथील बांठीया हायस्कूल शेजारील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ३ मध्ये पाणी शिरल्याने हे केंद्र तात्पुरते  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १ व कर्नाटक हॉल याठिकाणी हालविण्यात करण्यात आले आहे.

कळंबोली हायवेवरून कॉलनी मध्ये जाण्याच्या रस्त्यावर झाड पडायला आले होते ते काढण्यात आले. पालेखुर्द पाटिल वाडी येथे सखल भागात पाणी साठले होते ते काढण्यासाठी नाला काढण्याची गरज होती मात्र नाला काढण्यास स्थानिक रहिवाशी विरोध करत होते.

हायक आयुक्त वंदना गुळवे यांनी स्वतः या  ठिकाणी उपस्थित राहून जेसीबीच्या साहाय्याने तातडीने नाल्याचे काम केल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली.

पनवेल महानगरपालिकेच्या कळंबोली नोडमध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, आरोग्य निरीक्षक ,अतिक्रमण पथक व सफाई कामगार यांच्यामार्फत ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले होते ते फ्लोटिंग पंप वापरून, प्रयत्न करून पाणी काढण्यात आले.

कोविड सेंटरच्या आवारात पाणी

खिडुक पाडा, आदिवासी वाडी येथील लोकांच्या घरांमध्ये पाणी जाऊ नये म्हणून किंवा कोणतीही हानी होऊ नये म्हणून या लोकांना कळंबोलीच्या प्रभाग कार्यालय येथे हलविण्यात आले आहे.

नवीन पनवेल सेक्टर 7 जवळ पाणी साचले होते, खांदा कॉलनी सिग्नल जवळ साचलेले पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला. तसेच कळंबोली येथील कोविड सेंटरच्या आवारात साचलेले पाणी पंप लावून, पाणी काढण्यात आले .

तळोजा गाव मन्नन कॉलोनी या ठिकाणची सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे  यांनी पाहणी केली. या ठिकाणच्या बाधित कुटुंबातील महिला व मुले यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

वेधशाळेने अजून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी केले आहे.

पारगाव डुगी गाव पुन्हा पाण्याखाली

प्रस्तावित नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी नवी मुबई आणि पनवेल तालुका परिसरातील काही गावाचा ताबा घेऊन त्या ठिकाणी विमानतळाचे कामकाज सध्या सुरू आहे. या विमानतळाच्या कामकाजा निमित्ताने या परिसरात मातीचा भराव करण्यात आला  आहे.

या भरवामुळे या परिसरातील आजूबाजूच्या गावांना आता पुराचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्या मध्ये पारगाव डुगी गावाचा समावेश आहे, प्रत्येक पावसाळ्यात या गावा मध्ये पाणी शिरल्याचे चित्र पहायलामिळते या वर्षी देखील या गावांना पावसाच्या पाण्याच्या फटका सहन करावा लागला आहे. गावातील जवळपास 126 हून धिक घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील सामनासह घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही जणांना आख्खी रात्र जागून काढावी लागल्याची ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे.

हे ही वाचलत का :

Back to top button