

मुंबई;पुढारी ऑनलाईन : पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरण उघड झालं आणि नवर्याला वाचविण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी धडपड केली;पण पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सर्व दबाव झुगारत राज कुंद्राच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरण केलेल्या धडक कारवाईची देश पातळीवर चर्चा हाेत आहे.
अधिक वाचा
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाली. ज्या कारणासाठी त्याला अटक झाली याने सर्वांनाच धक्का बसला.
तो पॉर्न व्हिडिओ रॅकेटचा सूत्रधार असल्याचा मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. शिल्पा शेट्टीने पतीविरोधात कारवाई टाळण्यासाठी राजकीय ओळखाचा वापर केला. मात्र याला यश आले नाही, अशी चर्चा आहे.
अधिक वाचा
राज कुंद्राविराेधातील कारवाई टाळण्यासाठी अनेक पक्षांमधील नेत्यांना फोन करण्यात आले. मात्र या प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच रिर्पाट करत होते.
कायदानुसार योग्य कारवाई करावी अशी सूचना नगराळे हाेती. त्यामुळे ते या हायप्राेफाईल प्रकरणात धडक कारवाई करु शकले, असे मानले जात आहे.
अधिक वाचा
फेब्रुवारी महिन्यातच एका मॉडलने पॉर्न व्हिडिओ रॅकेटमध्ये राज कुंद्राचा सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केला होता. मात्र त्याने सर्व आरोप फेटाळले. मी निर्दोष आहे, असा थयथयाटही त्याने केला. यासंदर्भातील वृत्त देणार्या माध्यम संस्थांना कायदेशीर कारवाईची नोटीसही पाठवली त्याने पाठवली हाेती.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कुंद्राच्या सहकार्याला अटक केली. यानंतर पॉर्न व्हिडिओ रॅकेटप्रकरणातील माहिती समोर आली. पोलिसांनी सर्वप्रथम ठोस पुरावे गोळा केले.
राज कुंद्रा याने आपली पत्नी शिल्पा शेट्टीच्या प्रतीमेचा वापर केला. त्याने ॲप जेएल ५०चे ब्रँड ॲम्बेसडर शिल्पा शेट्टीला केले.या ॲपचा जोरदार प्रचार केला.
हेॲप केंद्र सरकारची योजना मेक इन इंडियाला संलग्न करण्याचा प्रयत्न केला.
शिल्पा शेट्टीच्या प्रतीमेचा वापर करत काही राजकीय नेत्यांबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्नही राज कुंद्राने केली होता.
पॉर्न व्हिडिओ रॅकेटप्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व प्रथम ठोस पुरावे गोळा केले. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची माहिती दिली.
या प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हे थेट मुख्यमंत्री ठाकरे यांनाच रिर्पाट करत होते.
कायदानुसार योग्य असेल ती कारवाई करावी, असे आदेश नगराळे यांना मिळाले. त्यानुसार त्यांनी ही मोठी कारवाई केली.
हेमंत नगराळे हे १९८७च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी सेवा बजावलेल्या ठिकाणी नेहमीच आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
त्यांनी केलेल्या अनेक प्रकरणाची देशपातळीवर चर्चा झाली आहे.
उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकांनी गौरवण्यात आले आहे.
पॉर्न व्हिडिओ रॅकेटप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणात तो दोषी आढळ्यास त्याला ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा१० लाखांच्या दंडाच्या शिक्षा हाेवू शकते.