Stock Market Closing Bell | बाजारात ३ दिवसांनंतर तेजीचा माहौल, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग

Stock Market Closing Bell | बाजारात ३ दिवसांनंतर तेजीचा माहौल, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील सुधारणा आणि एचडीएफसी बँकेच्या तिमाही कमाईच्या आकडेवारीनंतर झालेल्या खरेदीमुळे आज मंगळवारी शेअर बाजारात तीन दिवसांनंतर तेजी परतली. सेन्सेक्स आज २६१ अंकांनी वाढून ६६,४२८ वर बंद झाला. तर निफ्टी ७९ अंकांच्या वाढीसह १९,८११ वर स्थिरावला.

 संबंधित बातम्या 

आजच्या ट्रेडिंग सत्रात पॉवर निर्देशांक १ टक्के वाढला. तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर एफएमसीजी (FMCG), पीएसयू बँक, मेटल, ऑईल आणि गॅस प्रत्येकी ०.५ टक्‍क्‍यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.४ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वाढला. विशेषतः बँका, एनर्जी आणि एफएमसीजी स्टॉक्समधील तेजीमुळे आज बाजाराला सपोर्ट मिळाला. तर रिअल्टी क्षेत्र दबावाखाली राहिले.

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्स आज (Sensex Today) ६६,५५८ वर खुला झाला होता. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्सची हीच पातळी कायम राहिली. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिडचा शेअर २ टक्के वाढून (२०७ रपये) टॉप गेनर राहिला. त्यासोबतच टेक महिंद्रा, कोटक बँक, एनटीपीसी, आयटीसी, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, बजाज फायनान्स हे शेअर्सही वाढले. दरम्यान, टाटा मोटर्स, एलटी, इंडसइंड बँक, टीसीएस हे शेअर्स घसरले.

निफ्टी ५० वर एसबीआय लाईफ, पॉवर ग्रिड, बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, कोल इंडिया हे टॉप गेनर्स राहिले. तर टाटा मोटर्स, एलटी, यूपीएल, इंडसइंड बँक, टीसीएस हे घसरले.

जिओ फायनान्सियल सर्व्हिसेसचा शेअर वधारला

जिओ फायनान्सियल सर्व्हिसेस (Jio Financial Services) चे शेअर्स सोमवारी सुमारे ४ टक्क्यांनी वाढून २३३ रुपयांवर दिवसाच्या उच्चांकावर पोहोचले. या कंपनीने सप्टेंबर तिमाहीत ६६८ कोटी रुपयांच्या एकत्रित नफा मिळवला आहे. ही मोठी वाढ असल्याने त्यांचे शेअर्स वधारले.

जागतिक बाजार

इस्रायल-हमास युद्धाच्या (Israel-Hamas war) पार्श्वभूमीवर प्रादेशिक संघर्ष रोखण्यासाठी राजनैतिक प्रयत्न केले जात असल्याने आशियाई बाजारांत आज सुधारणा दिसून आली. दक्षिण कोरिया, जपान, चीन आणि हाँगकाँगमधील निर्देशांक मंगळवारी वाढले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news