PM Modi on Isro: PM मोदींकडून अंतराळ मोहिमांसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा; २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार!

PM Modi on Isro:
PM Modi on Isro:

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताचे चांद्रयान-३, सूर्यमोहिमेच्या यशानंतर 'गगनयान' प्रक्षेपणाठी सज्ज झाला आहे. शनिवारी, २१ ऑक्टोबरला गगनयानाचे प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेसंदर्भात आज पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील भारतीय अंतराळ मोहिमांचे वेळापत्रक जाहीर केले. आगामी वर्षात इस्रोच्या सहाय्याने भारत २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक उभारणार असून, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार असल्याचे आज (दि.१७) घेतलेल्या बैठकीत सांगितले. (PM Modi on Isro)

भारताची आगामी गगनयान मोहिमेच्या प्रगतीचे मूल्यांकन तसेच भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांच्या भविष्याची रूपरेषा तयार करण्यासाठी आज पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. पीएमओ (PMO) कार्यालयात झालेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी भविष्यातील महत्त्वपूर्ण अंतराळ मोहिमांची घोषणा केली. (PM Modi on Isro)

पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चांद्रयान-३, आदित्य-L1 सूर्यमोहिमेच्या यशानंतर आता गगनयानासंदर्भात चर्चा झाली. तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून भारत भविष्यात भारत शुक्र आणि मंगळावरील मोहिमा हाती घेणार आहे. तसेच २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक उभारले जाणार असून, २०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवणार असल्याचेही पीएम मोदी यांनी या बैठकीत सांगितले. (PM Modi on Isro)

पंतप्रधान मोदींनी भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांच्या भविष्याविषयीच्या बैठकीत भारतीय शास्त्रज्ञांना व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि मार्स लँडर यांचा समावेश असलेल्या आंतरग्रहीय मोहिमांच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले. तसेच भारताने आता नवीन आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करावीत असे निर्देश देखील या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news