IND vs ENG Test Series : यशस्वी भव! इंग्लंडच्या भूमीवर ऐतिहासिक कामगिरीसाठी जैस्वाल सज्ज, द्रविड-सहवागचा विक्रम धोक्यात

जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये 2000 कसोटी धावा पूर्ण केल्यास तो एक मोठा विक्रम रचेल.
IND vs ENG Test series Yashasvi Jaiswal Test record
Published on
Updated on

ind vs eng test series yashasvi jaiswal chance to completes 2000 test runs

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने दोन द्विशतके झळकावली होती, तर त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याने शतकी खेळी केली होती. आता इंग्लंडच्या भूमीवरही संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून अशाच उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ 202 धावांची आवश्यकता आहे.

सेहवाग-द्रविड यांचे रेकॉर्ड धोक्यात

यशस्वी जैस्वालने भारताकडून आतापर्यंत 36 कसोटी डाव खेळले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत जर जयस्वालने पहिल्या तीन डावांमध्ये 202 धावा केल्या, तर तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 2000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनेल. सध्या हा विक्रम राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आहे. या दोन्ही दिग्गज फलंदाजांनी प्रत्येकी 40 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.

IND vs ENG Test series Yashasvi Jaiswal Test record
India vs England first Test : टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी बातमी! हेडिंग्ले कसोटीपूर्वी करुणला दुखापत

19 कसोटी सामन्यांचा अनुभव

यशस्वी जैस्वालने 2023 मध्ये भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमातील एक अविभाज्य घटक बनला आहे. त्याने आतापर्यंत 19 कसोटी सामन्यांच्या 36 डावांमध्ये एकूण 1798 धावा केल्या आहेत, ज्यात चार शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचे फलंदाजीचे तंत्र उत्कृष्ट असून, एकदा तो खेळपट्टीवर स्थिरावला की त्याला बाद करणे प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरते.

IND vs ENG Test series Yashasvi Jaiswal Test record
IND vs ENG Test Series : ऐतिहासिक विजयापूर्वीचा वाद : वाडेकर-इलिंगवर्थ यांच्यातील शाब्दिक चकमकीने रंगलेली 1971 ची कसोटी मालिका

इंग्लंडविरुद्ध दोन द्विशतकांची नोंद

यशस्वी जैस्वालची इंग्लंडविरुद्धची कसोटीतील कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिली आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 5 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 712 धावा केल्या आहेत, ज्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 214 अशी आहे.

IND vs ENG Test series Yashasvi Jaiswal Test record
ICC Test Rankings : आयसीसी क्रमवारीत मोठे फेरबदल, ऋषभ पंतला फायदा, एडन मार्करमची मोठी झेप

केएल राहुलसोबत सलामीची शक्यता

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने, यशस्वी जैस्वालसोबत केएल राहुल डावाची सुरुवात करण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय कसोटी संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, जैस्वालवर धावा करण्याची मोठी जबाबदारी असेल आणि संघाला मजबूत स्थितीत आणण्यासाठी त्याला खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ व्यतीत करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्याच्या कामगिरीकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

IND vs ENG Test series Yashasvi Jaiswal Test record
Rishabh Pant 'X-factor' vs England : ऋषभ पंत का ठरू शकतो इंग्लंडमधील ‘एक्स-फॅक्टर’?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news