Yashasvi Jaiswal Creates History: एकही चेंडू न खेळता यशस्वी जयस्वालने रचला इतिहास... सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

India Vs New Zealand 2nd Test: प्लेईंग ११ जाहीर होताच त्याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकले आहे.
Yashasvi Jaiswal Creates History
Yashasvi Jaiswal Creates Historypudhari
Published on: 
Updated on: 

Yashasvi Jaiswal Creates History: ख्राईस्टचर्च इथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू झाला आहे. या सामन्यात भारताकडून संघाची घोषणा करण्यात आली असून यशस्वी जयस्वाल प्लेईंग ११ मध्ये सामील आहे. त्याची प्लेईंग ११ जाहीर होताच त्याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकले आहे.

Yashasvi Jaiswal Creates History
New Zealand VS India 1st Test : जिंकणारा कसोटी सामना 'ड्रॉ' झाल्यानंतर कॅप्टन शुभमन गिलने दिले सिराजला वगळण्याचे उत्तर....

संजय मांजरेकरांशी बरोबरी

यशस्वी जयस्वालने १२ जुलै २०२० रोजी वेस्ट इंडीजविरूद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याच्या पदार्पणानंतर तो सतत भारतीय संघाचा भाग राहिला आहे. यशस्वी जयस्वालने आपल्या साडेतीन वर्षाच्या कारकिर्दीत एकूण ३२ सामने खेळले असून आज तो ३३ वा कसोटी सामना खेळत आहे.

विशेष बाब म्हणजे यशस्वी जयस्वालने हे सर्व ३३ कसोटी सामने वेगवेगळ्या व्हेन्यूवर खेळले आहेत. पदार्पणानंतर सर्वाधिकवेळा सलग वेगवेगळ्या व्हेन्यूवर सामने खेळण्यामध्ये संजय मांजरेकर यांची बरोबर केली आहे. संजय मांजरेकर यांनी देखील आपल्या पदार्पणानंतर सलग ३३ वेगवेगळ्या व्हेन्यूवर सामने खेळले होते. त्यानंतर बंगळुरूचे मैदान पहिल्यांदा रिपीट झाले.

Yashasvi Jaiswal Creates History
जानेवारीत म्हाडा मुंबईची पुन्हा सोडत, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची घोषणा
Yashasvi Jaiswal Creates History
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी जैस्वालचे स्फोटक शतक; साई सुदर्शन अपयशी, देवदत्त पडिक्कल भोपळाही न फोडता बाद

सचिनला टाकलं मागे

यशस्वीने या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर एकूण २३ सामने वेगवेगळ्या व्हेन्यूवर खेळले होते. या यादीत तिसऱ्या स्थानावर जवागल श्रीनात आहे. त्याने एकूण २४ सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळले.

पदार्पणापासून (डेब्यू) सलग वेगवेगळ्या मैदानांवर सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू

संजय मांजरेकर - ३३

यशस्वी जयस्वाल - ३३

सचिन तेंडुलकर - ३२

जवागल श्रीनाथ - २४

दिनेश रामदिन - २४

Yashasvi Jaiswal Creates History
Gurnoor Brar NZ vs IND: गुरनूर ब्रारवर वेस्ट इंडीजचा माजी खेळाडू भलताच खुश.... BCCI ला दिला खास सल्ला

यशस्वी जयस्वालने खेळलेल्या सर्व ३३ कसोटी सामन्यांची मैदाने (वेन्यू)

१. रोसेउ

२. पोर्ट ऑफ स्पेन

३. सेंच्युरियन

४. केपटाऊन

५. हैदराबाद

६. विशाखापट्टणम

७. राजकोट

८. रांची

९. धर्मशाला

१०. चेन्नई

११. कानपूर

१२. बंगळुरू

१३. पुणे

१४. वानखेडे

१५. पर्थ

१६. अॅडलेड

१७. ब्रिस्बेन

१८. मेलबर्न

१९. सिडनी

२०. लीड्स

२१. बर्मिंगहॅम

२२. लॉर्ड्स

२३. मँचेस्टर

२४. द ओव्हल

२५. अहमदाबाद

२६. दिल्ली

२७. ईडन गार्डन्स

२८. गुवाहाटी

२९. न्यू चंदीगड

३०. गॉल

३१. कोलंबो (SSC)

३२. वेलिंग्टन

३३. क्राइस्टचर्च

Yashasvi Jaiswal Creates History
Vaibhav Sooryavanshi : हा तर क्रिकेटच्या देवाचा मुलगा... माजी क्रिकेटपटूची वैभवसाठी तुफान बॅटिंग; BCCI कडे केली मोठी मागणी

यशस्वी जयस्वालची कसोटी कारकीर्द

भारताच्या या युवा सलामीवीराच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ३२ कसोटी सामन्यांच्या ५८ डावांमध्ये फलंदाजी करताना ४८.१६ च्या शानदार सरासरीने आणि ६७.१४ च्या स्ट्राईक रेटने एकूण २६९७ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १४ अर्धशतके, ७ शतके आणि दोन द्विशतके झळकावली आहेत. आता आपल्या सुरू असलेल्या ३३ व्या कसोटी सामन्यात तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.