Gurnoor Brar NZ vs IND: गुरनूर ब्रारवर वेस्ट इंडीजचा माजी खेळाडू भलताच खुश.... BCCI ला दिला खास सल्ला

बिशप यांनी गुरनूर ब्रार बाबत बीसीसीआयला एक खास सल्ला देखील दिला.
Gurnoor Brar NZ vs IND
Gurnoor Brar NZ vs INDpudhari
Published on: 
Updated on: 

Gurnoor Brar NZ vs IND: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा गोलंदाज गुरनूर ब्रार यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्याने न्यूझीलंडचे ४ फलंदाज बाद करत त्यांचा डाव १३४ धावात रोखण्यात मोलाचा वाटा उचलला. गुरनूर ब्रारने पहिल्या सामन्यात देखील चांगला मारा करत आपला चुणूक दाखवली होती.

गोलंदाजीला थोडी साथ देणारी खेळपट्टी मिळाल्यावर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर वेस्ट इंडीजचा माजी खेळाडू इयन बिशप जाम खुश झाला. बिशप यांनी गुरनूर ब्रारबाबत बीसीसीआयला एक खास सल्ला देखील दिला. त्यांनी गुरनूर ब्रारला जास्तकाळ संधी द्या म्हणजे त्याची गुणवत्ता तो सिद्ध करून दाखवू शकेल.

Gurnoor Brar NZ vs IND
Virat Kohli Breaks Ricky Ponting Record: दुसर्‍या वनडेत 'फ्‍लॉप शो' तरीही विराट कोहलीकडून रिकी पाँटिंगचा विक्रम मोडित!

काय म्हणाले इयन बिशप?

इयन बिशप यांनी एक्सवर पोस्ट केली की, 'असे दिवस गोलंदाजांना थोडी जरी खेळपट्टीकडून साथ मिळाली तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांची ताकद दाखवून देतात याची आठवण करून देतात. गुरनूर ब्रार सारख्या वेगवान गोलंदाजांना खेळण्याची अधिक संधी देणे का महत्वाचे आहे देखील यावरून लक्षात येते. त्यांना शक्य तेवढी संधी द्यावी तरच ते तुम्हाला हवे असलेले खेळाडू असू शकतात का हे सिद्ध करू शकतील.'

Gurnoor Brar NZ vs IND
India A vs New Zealand A : बुमराह आणि जडेजा ‘इंडिया अ’ संघात; ऋषभ पंत तिसऱ्या सामन्याला मुकणार

भारताची दमदार गोलंदाजी

पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला १८५ धावात रोखले. त्यानंतर आता दुसऱ्या वनडे सामन्यात १३४ धावात गारद केले. भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी यजमानांच्या फलंदाजांना कायम दबावात ठेवलं आहे.

पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यात शुभमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांची खरा करून दाखवला. त्यांनी परिस्थितीचा चांगला फायदा उचलत न्यूझीलंडचा डाव स्वस्तात गुंडाळला.

Gurnoor Brar NZ vs IND
NZ vs IND Arshdeep Singh: श्रीनाथ अन् शमी नंतर 'अर्शदीप'च... न्यूझीलंडमध्ये केली मोठी कामगिरी, सामन्यावर भारताची पकड

भारताचाही डाव गडगडला

भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला ठराविक अंतराने धक्के दिले. न्यूझीलंडकडून डॅरल मिचेलने झुंजार खेळी करत अर्धशतक झळकावले. मात्र इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. गुरनूर ब्रारने ३५ धावात ४ विकेट्स घेतल्या. तर आकिब नबी, अंशुल काम्बोज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

१३५ धावांचे टार्गेट पार करताना भारताची देखील चांगलीच दमछाक झाली. भारताची अवस्था ४ बाद ४७ धावा अशी झाली होती. मात्र श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांनी भारताला सावरत सामन्यात रंगत निर्माण केली. भारताचे जरी ७ फलंदाज तंबूत गेले असले तरी विजयासाठी फक्त २२ धावांची गरज आहे. केएल राहुल २७ धावा करून क्रीजवर असून पावसामुळे सामना थांबला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.