New Zealand VS India 1st Test : जिंकणारा कसोटी सामना 'ड्रॉ' झाल्यानंतर कॅप्टन शुभमन गिलने दिले सिराजला वगळण्याचे उत्तर....

लाळेच्या वापरावर बंदीसह खेळपट्टीवरही व्यक्त केली नाराजी
Shubman Gill On Mohammed Siraj
Shubman Gill On Mohammed SirajPudhari News
Published on: 
Updated on: 

Shubman Gill On Mohammed Siraj : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक नव्या विक्रमांची नोंद करणारा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. एकीकडे टीम इंडियाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र पाचव्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या संयमित फलंदाजीसमोर गोलंदाजांकडे उत्तर नव्हते. अखेर जिंकणारा सामना अनिर्णित राहिला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कर्णधार शुभमन गिलने वेगवान गोलंदाज सिराजला कोणत्या कारणास्तव वगळले याचे उत्तर दिले. तसेच मागील काही दिवसांपासून सिराजला संघातून वगळण्यावर सुरू असणाऱ्या 'राजकारण'वरही आता पडदा पडला आहे.

शुभमन गिलची रोखठोक भूमिका

बेसिन रिझर्व्हवर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांची अचूकता फरक पाडू शकली असती का, असा सवाल पत्रकार परिषदेत विचारला असता भारतीय कर्णधार शुभमन गिलने थेट उत्तर दिले की, "मला तसे वाटत नाही." या प्रश्नापूर्वीच गिलने मालिकेतील पहिल्या कसोटीच्या अंतिम अकरा जणांमध्ये सिराजचा समावेश का केला नाही, याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले होते. "अत्यंत कठीण निर्णय" घेताना सध्याचा फॉर्म हाच प्रमुख निकष ठरल्याचे त्याने ठामपणे सांगितले.

Shubman Gill On Mohammed Siraj
India vs New Zealand 1st Test : डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी हिरावली भारताची विजयाची संधी; वेलिंग्टन कसोटी 'ड्रॉ'

कोण सर्वोत्तम गोलंदाजी करत आहेत, हे पाहावे लागते

"सिराज हा उत्कृष्ट खेळाडू आणि भारतासाठी उत्तम कामगिरी केलेला दर्जेदार गोलंदाज आहे. त्याहीपलीकडे तो माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही एकत्र पदार्पण केले. भारतासाठी खेळण्यापूर्वीपासून आमची घट्ट मैत्री आहे. त्यामुळे त्याला बाहेर ठेवणे हा त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही खूप कठीण निर्णय होता. पण काही वेळा कोणते गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि कोण सर्वोत्तम गोलंदाजी करत आहेत, हे पाहावे लागते," असेही गिल म्हणाला.

Shubman Gill On Mohammed Siraj
Kapil Dev : "तो विनोद कांबळीसारखा गायब न व्हावा..." : वैभव सूर्यवंशीबाबत माजी क्रिकेटपटू कपिल देव नेमकं काय म्हणाले?

प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा टप्पा येतो

"सामन्यापूर्वीच मी त्याला सांगितले होते की तू या सामन्यात खेळणार नाहीस. तो माझ्याशी सहमत होता की नाही हे मला माहीत नाही, पण त्याला त्यामागचा तर्क समजला. आम्ही दुसऱ्या एखाद्याला त्याच्या पुढे का संधी दिली, हे त्याला कळले. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत किंवा आयुष्यात असा एक टप्पा येतो, जेव्हा तुम्ही नेहमीच कारकिर्दीच्या शिखरावर नसता. हे त्यालाही उमगले आहे," असेही गिलने स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत सिराजला वगळण्यावरून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. त्याला राजकीय किनारही लाभली. यानंतर आज सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने न लागल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली. मात्र, आपण घेतलेल्या निर्णयावर गिल पूर्णपणे ठाम दिसला. कसोटी सामन्यात बहुतांश काळ भारताचेच वर्चस्व राहिले; परंतु अंतिम दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दिलेल्या झुंजीमुळे भारताचा विजय हुकला.

Shubman Gill On Mohammed Siraj
Sunil Gavaskar : "हे खेळ भावनेच्या विरोधात..." ; वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर सुनील गावस्‍कर का संतापले?

चेंडूवर लाळ लावण्याची परवानगी असायला हवी

संघांना चेंडूवर लाळ लावण्याची परवानगी असायला हवी. कोरोना काळात चेंडूला लाळ लावू नये, असा नियम होता. आता आपण त्या काळापासून खूप पुढे आलो आहोत. तुम्ही चेंडूला चकाकी देऊ शकत नसाल किंवा चेंडू नीट राखू शकत नसाल विशेषतः अशा खेळपट्ट्यांवर तर गोलंदाजाचे काम खूपच अवघड होते. शिवाय, अलीकडे चेंडूंची अवस्थाही फारशी चांगली राहिलेली नाही. इंग्लंडमध्येही आम्हाला अशीच अडचण आली होती. ५० षटकांनंतर चेंडू मऊ पडतो, हे आम्हाला समजते, पण २५-३० षटकांतच चेंडू मऊ पडत असेल किंवा त्याचा आकार बिघडत असेल, त्यातच लाळ वापरून चेंडू सांभाळता येत नसेल, तर गोलंदाजांसाठी ते अत्यंत कठीण आव्हान असते," असेही गिलने स्पष्ट केले.

Shubman Gill On Mohammed Siraj
kapil dev : ‘इतर खेळाडूंनाही यातून प्रेरणा मिळेल’; भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनावर कपिल देव नेमकं काय म्हणाले?

'दर्जेदार कसोटी खेळपट्टी नाही'

कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अशा सलग दोन कसोटी सामन्यांत भारताला अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले आहे. "आम्ही कसोटी सामना सुरू केला तेव्हा खेळपट्टीतून अधिक मदत मिळेल, असे वाटले होते. पण तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी ती अधिकच सपाट होत गेली. खेळपट्टीवर कोणतेही खड्डे किंवा भेगा तयार झाल्या नाहीत. टाकलेल्या षटकांचा किंवा खेळल्या गेलेल्या दिवसांचा खेळपट्टीवर कोणताही परिणाम झाला नाही. खेळपट्टी केवळ अधिक संथ होत गेली. हे पाहता, विशेषतः निकाल हवा असेल तर ही चांगली कसोटी खेळपट्टी नव्हती, असे मला वाटते. मात्र, मी आधी म्हटल्याप्रमाणे, जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेमुळे आजकाल निकालांची खूप चर्चा होते; पूर्वी अनिर्णित सामने खूप सामान्य होते. त्यामुळे लोक सामन्यांच्या अनिर्णित निकालाबद्दल इतका विचार करायचे नाहीत," असे गिलने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.