Rishabh Pant Delhi Capitals : तब्‍बल १२ कोटींची कपात स्वीकारत ऋषभ पंत 'दिल्ली'त परतला, कुलदीप लखनऊकडे रवाना!

आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या 'प्लेअर ट्रेड'
Rishabh Pant Delhi Capitals
Rishabh Pant Delhi Capitals Pudhari
Published on
Updated on

Rishabh Pant Delhi Capitals : यंदाच्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) निराशाजनक हंगामानंतर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि ऋषभ पंत यांनी सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मानधनात मोठी कपात स्वीकारत पंत आता त्याच्या जुन्या 'दिल्ली कॅपिटल्स' (DC) संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. तर कुलदीप यादव आता लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाकडून खेळेल, अशी घोषणा आयपीएलने आपल्या अधिकृत पत्रकात केली आहे.

ऋषभ 15 कोटींच्या शुल्कासह पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार सामील

आयपीएलने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "TATA IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने पंतला तब्बल 27 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले होते, ही आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली ठरली होती. मात्र, आता झालेल्या ट्रेडनंतर तो 15 कोटी रुपयांच्या सुधारित शुल्कासह पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होईल."

Rishabh Pant Delhi Capitals
Rishabh Pant resigns : ऋषभ पंतचा राजीनामा.. LSG चे कर्णधारपद सोडले! IPL 2026 मधील निराशाजनक कामगिरीमुळे घेतला निर्णय

दिल्लीशी पंतचे जुने नाते

ऋषभ पंत पुन्हा एकदा अशा संघात परतत आहे. २०१६ ते २०२४ या कालावधीत सलग ९ हंगाम तो दिल्‍ली संघात होता. दिल्ली कॅपिटल्ससाठी त्याने सर्वाधिक १११ सामने खेळले आहेत. जवळपास एक दशक या फ्रँचायझीचा मुख्य चेहरा राहिलेल्या पंतने २०२१ ते २०२४ दरम्यान ४ हंगामात ४३ सामन्यांमध्ये दिल्लीचे नेतृत्वही केले आहे.

Rishabh Pant Delhi Capitals
Sai Sudharsan: चौकार मारला आणि... साई सुदर्शन पुन्हा हिट-विकेट! IPL मध्ये नकोसा विक्रम नावावर; रवी शास्त्रींची भन्नाट कमेंट

मानधनात तब्बल १२ कोटींची कपात

'टाटा आयपीएल २०२५' च्या मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) पंतला तब्बल २७ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून संघात घेतले होते. ही बोली आयपीएल इतिहासातील सर्वोच्च बोली होती. मात्र, आता झालेल्या या 'ट्रेड' करारानुसार, तो १५ कोटी रुपयांच्या सुधारित मानधनासह दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणार आहे. म्हणजेच दिल्लीत येण्यासाठी त्याने तब्बल १२ कोटी रुपयांचे नुकसान सहन केले आहे.

Rishabh Pant Delhi Capitals
IPL 2026: अर्शदीप सिंगने अचानक डिलीट केल्या 200 हून अधिक पोस्ट; विराट कोहलीचा व्हायरल व्हिडिओही हटवला, नेमकं काय घडलं?

ऋषभ पंतचा लखनऊ सुपर जायंट्समधील निराशाजनक प्रवास

IPL 2025 च्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने २७ कोटी खर्च करून पंतला खरेदी केले. तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. संघात सामील होताच त्याच्याकडे लखनऊचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली IPL 2025 आणि IPL 2026 या दोन्ही हंगामात लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. 2025 मध्ये लखनऊचा संघ सातव्या स्थानावर राहिला, तर नुकत्याच संपलेल्या (2026) हंगामात अवघ्या आठ गुणांसह ते गुणतालिकेत सर्वात शेवटी म्हणजेच 10 व्या स्थानावर फेकले गेले.

Rishabh Pant Delhi Capitals
Dhoni leave CSK : धोनीची सीएसकेला सोडचिठ्ठी? जडेजा-सॅमसनच्या मुद्द्यावरून चेन्नईच्या गोटात ठिणगी; १८ वर्षांचे नाते...

कुलदीप यादव आता लखनऊकडून खेळणार

चायनामन गोलंदाज कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्समधील ५ वर्षांचा यशस्वी प्रवास संपवून बाहेर पडला आहे. २०२२ मध्ये दिल्ली संघात सामील झाल्यापासून कुलदीपने ६५ सामन्यांत ७२ बळी घेत आयपीएलमधील सर्वात प्रभावी विकेट घेणारा गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. भारताचा हा आघाडीचा मर्यादित षटकांचा गोलंदाज आता त्याच्या सध्याच्या १३.५० कोटी रुपयांच्या मानधनासह लखनऊ सुपर जायंट्स संघात दाखल होईल.

पंतने दिला होता कर्णधारपदाचा राजीनामा

पंतची फलंदाजीतील कामगिरीही फारशी प्रभावी ठरली नाही. IPL 2025 मध्ये त्याने 14 सामन्यांत 133.17 च्या स्ट्राईक रेटने केवळ 269 धावा केल्या. एक शतक आणि एका अर्धशतकाचा अपवाद वगळता त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही.IPL 2026 हंगामात त्याने 14 सामन्यांत 138.05 च्या स्ट्राईk रेटने 312 धावा केल्या. संपूर्ण हंगामात त्याला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले. या खराब कामगिरीनंतर पंतने IPL 2026 चा हंगाम संपताच लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

Rishabh Pant Delhi Capitals
CSK IPL 2026: धोनीच्या संघाला लागला सर्वात मोठा कलंक; चेन्नईच्या नावावर २ लाजिरवाणे रेकॉर्ड्स!

कुलदीप यादवचा दिल्ली कॅपिटल्समधील यशस्वी प्रवास

कुलदीप यादव IPL 2022 च्या हंगामापूर्वी 2 कोटी रुपयांमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला होता आणि या फ्रँचायझीसोबतचा त्याचा प्रवास अत्यंत यशस्वी राहिला.त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी 65 सामने खेळताना 72 बळी घेतले आणि लीग मधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून स्वतःला सिद्ध केले. दिल्लीसाठी त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन IPL 2022 मध्ये पाहायला मिळाले, जिथे त्याने 14 सामन्यांत 21 विकेट्स घेतल्या होत्या.

Rishabh Pant Delhi Capitals
Virender Sehwag |"भारतीय संघात जागा आहे कुठे?" : श्रेयस अय्यर, पडिक्कलच्‍या टीम इंडियातील निवडीवर सेहवाग काय म्‍हणाला?

दोन्ही संघांना अजूनही पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा

दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांना अद्याप एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. दिल्ली कॅपिटल्सने 2020 च्या हंगामात अंतिम फेरीत धडक मारली होती, परंतु तिथे त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. तर, IPL 2022 मध्ये पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने 2022 आणि 2023 मध्ये सलग दोनदा प्लेऑफ गाठले, मात्र दोन्ही वेळा त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news