IPL 2026: अर्शदीप सिंगने अचानक डिलीट केल्या 200 हून अधिक पोस्ट; विराट कोहलीचा व्हायरल व्हिडिओही हटवला, नेमकं काय घडलं?

Arshdeep Singh Instagram: भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अचानक इंस्टाग्रामवरील 200 हून अधिक पोस्ट डिलीट केल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Arshdeep Singh Deletes Instagram Posts
Arshdeep Singh Deletes Instagram PostsPudhari
Published on
Updated on

Arshdeep Singh Deletes Instagram Posts: भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्शदीपने अचानक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरील 200 हून अधिक पोस्ट डिलीट केल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, त्याने आपला प्रोफाइल फोटोही बदलला आहे.

यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेक चाहत्यांनी हे ‘पर्सनल रिसेट’, सोशल मीडिया क्लीनअप किंवा नव्या इमेजसाठी ‘रीब्रँडिंग’ असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, अर्शदीपने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

विराट कोहलीसोबतचा व्हायरल व्हिडिओही गायब

अर्शदीपने डिलीट केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहली सोबतचा व्हायरल व्हिडिओही आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यानचा हा व्हिडिओ तब्बल 150 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवून प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता हा व्हिडिओ त्याच्या अकाउंटवर दिसत नाही.

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान अर्शदीपने पंजाब किंग्सशी संबंधित सर्व पोस्ट हटवलेल्या नाहीत. त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये अजूनही Punjab Kings चा उल्लेख कायम आहे. त्याच्या प्रोफाइलवर सध्या कुटुंबीयांसोबतचे फोटो, क्रिकेटमधील महत्त्वाचे क्षण आणि ब्रँड प्रमोशनशी संबंधित पोस्ट दिसत आहेत.

IPL 2026 मध्ये वादांमुळे चर्चेत

IPL 2026 हंगामात अर्शदीप अनेक वादांमुळे चर्चेत राहिला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सहकारी खेळाडू तिलक वर्मा याच्याबद्दल वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता.

Arshdeep Singh Deletes Instagram Posts
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला दुहेरी झटका! टीम इंडियाच्या कर्णधारपदाचे स्वप्न भंगणार; शुभमन गिल मारणार बाजी?

अर्शदीपने कथितपणे “ओए अंधेरे, सनस्क्रीन लगाया?” असे म्हटल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. या घटनेनंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली.

यावर भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी प्रतिक्रिया देत अर्शदीपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच, BCCI ने कारवाई केल्यास आपल्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्यांची नावे उघड करेन, असेही त्यांनी म्हटले होते.

चाहत्यासोबत वाद, स्नॅपचॅट पोस्टवरूनही टीका

याशिवाय, पंजाब किंग्सचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाल्यानंतर एका चाहत्याला स्नॅपचॅटवर अर्शदीपने संतप्त प्रतिक्रिया दिल्याचाही वाद समोर आला होता. तसेच, सहकारी खेळाडू प्रियांश आर्य सोबतची आणखी एक व्हायरल स्नॅपचॅट स्टोरीही टीकेचा विषय ठरली होती.

Arshdeep Singh Deletes Instagram Posts
RCB vs GT Qualifier 1: RCB vs GT सामना आज; हेड-टू-हेड रेकॉर्ड, सर्वाधिक धावा आणि विकेट्स कोणाच्या नावावर?

मैदानावरही निराशाजनक कामगिरी

सोशल मीडियावरील वादांव्यतिरिक्त IPL 2026 अर्शदीपसाठी फारशी खास ठरली नाही. त्याने 14 सामन्यांत केवळ 14 विकेट्स घेतल्या. तसेच त्याचा इकॉनॉमी रेट 10 पेक्षा जास्त राहिला, ज्यामुळे त्याच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित झाले. आता अचानक पोस्ट डिलीट करण्यामागे नेमकं कारण काय, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news