Sai Sudharsan: चौकार मारला आणि... साई सुदर्शन पुन्हा हिट-विकेट! IPL मध्ये नकोसा विक्रम नावावर; रवी शास्त्रींची भन्नाट कमेंट

Sai Sudharsan Hit Wicket: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या क्वालिफायर-2 सामन्यात साई सुदर्शन पुन्हा हिट-विकेट झाला. साई सुदर्शनच्या नावावर नकोसा विक्रम, सलग दुसऱ्या सामन्यात असाच झाला बाद
Sai Sudharsan Hit Wicket
Sai Sudharsan Hit WicketPudhari
Published on
Updated on

Sai Sudharsan Hit Wicket: IPL 2026 च्या क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर दमदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र या सामन्यात गुजरातचा स्टार फलंदाज साई सुदर्शन पुन्हा एकदा विचित्र पद्धतीने बाद झाल्याने चर्चेचा विषय ठरला. सलग दुसऱ्या सामन्यात तो हिट-विकेट झाल्याने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुदर्शन जबरदस्त लयीत दिसत होता. त्याने अवघ्या 32 चेंडूत 58 धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार होता. गुजरातच्या विजयाचा पाया तो रचत असतानाच एक अनपेक्षित घटना घडली.

नेमकं काय घडलं?

13व्या षटकात राजस्थानकडून बृजेश शर्मा गोलंदाजीसाठी आला. षटकातील एका चेंडूवर साईने जोरदार फटका मारत चौकार मारला. पण शॉट खेळतानाच त्याचा बॅटवरील ताबा सुटला आणि बॅट थेट स्टंप्सवर आदळली.

नियमांनुसार फलंदाजाची बॅट स्टंप्सला लागल्याने पंचांनी सुदर्शनला हिट-विकेट आउट दिलं. हा प्रकार पाहून स्टेडियममधील चाहत्यांसह समालोचकही अवाक झाले.

विशेष म्हणजे, याआधी RCB विरुद्धच्या क्वालिफायर-1 मध्येही साई सुदर्शन अशाच प्रकारे हिट-विकेट आउट झाला होता. सलग दोन सामन्यांत एकाच पद्धतीने बाद होणं हे क्रिकेटमध्ये अत्यंत दुर्मिळ मानलं जातं.

रवी शास्त्रींची भन्नाट प्रतिक्रिया

समालोचनादरम्यान माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनीही यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. “फेविकॉल कुठे आहे?” असं म्हणत त्यांनी सुदर्शनची बॅट पुन्हा हातातून सुटल्यावर हलक्याफुलक्या अंदाजात टिप्पणी केली.

Sai Sudharsan Hit Wicket
Hardik Pandya | ‘मेंटली स्ट्रेस्ड’ हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडणार!

सुदर्शनच्या नावावर नकोसा विक्रम

या विकेटसह साई सुदर्शनच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. तो आता पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 3 वेळा हिट-विकेट होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोहोचला आहे.

या यादीत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल आणि पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, सुदर्शनचे तिन्ही हिट-विकेट IPL मध्येच झाले आहेत.

Sai Sudharsan Hit Wicket
Rishabh Pant resigns : ऋषभ पंतचा राजीनामा.. LSG चे कर्णधारपद सोडले! IPL 2026 मधील निराशाजनक कामगिरीमुळे घेतला निर्णय

दरम्यान, या विचित्र बाद होण्याच्या घटनेनंतरही गुजरात टायटन्सने राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवत IPL 2026 च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आता 31 मे रोजी अहमदाबादमध्ये गुजरातचा सामना RCB विरुद्ध रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news