MS Dhoni Latest Update: धोनी IPL मधून आधीच निवृत्त झालाय...? अश्विननं CSK चा सगळा विषयच उलगडून सांगितला

MS Dhoni Latest Update
MS Dhoni Latest UpdatePUDHARI
Published on
Updated on

MS Dhoni Latest Update: चेन्नई सुपर किंग्जचा थला एमएस धोनी हा यंदाच्या हंगामात csk कडून एकही सामना खेळलेला नाही. त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळं त्याने प्लेईंग ११ पासून दूर राहणेच पसंत केलं आहे. त्यातच तो टीम सोबत सामन्यावेळी देखील मैदानात हजर रहात नाहीये. तो सरावावेळी आपल्या संघातील खेळाडूंसोबत असतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. म्हणजे त्याने सीएसकेच्या मार्गदर्शन मंडळात जाण्याची पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने धोनीच्या निवृत्तीबाबतचा सगळा विषय समजावून सांगितला आहे. त्यावरून धोनी पुन्हा मैदानावर उतरेल याची शक्यता धुसरचं दिसत आहे.

MS Dhoni Latest Update
R Ashwin Support Ruturaj : ‘धोनी तरी कुठे प्रत्येक सामन्यात धावा करतो?’; ऋतुराजच्या समर्थनासाठी अश्विन धावला

रविचंद्रन अश्विन म्हणतो की, सध्याच्या घडीला संघाच्या स्ट्रक्चरमध्ये असं सीजनच्या मध्यात धोनीने पुन्हा प्लेईंग ११ मध्ये प्रवेश करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. धोनीने हे मत आपल्या युट्यूब चॅनवर बोलताना दिलं. त्यानं आपल्या खास शैलीत संपूर्ण परिस्थितीचं विश्लेषण केलं.

अश्विन म्हणाला, 'जर धोनी संघात परत आला तर संघाचं कॉम्बिनेशनच बदलेल. ते खूपच अवघड होऊन जाईल. त्यामुळं मला असं वाटतं की धोनी पुन्हा मैदानावर येईल याची अत्यंत कमी शक्यता आहे.

MS Dhoni Latest Update
MS Dhoni: धोनी मैदानात कधी परतणार? अश्विनचा मोठा खुलासा; म्हणाला, "CSK स्पर्धेतून बाहेर पडल्यावरच..."

धोनीसाठी फेअरवेलही अवघड

अश्विनने महेंद्रसिंह धोनी शेवटचा चेन्नईच्या जर्सीत खेळताना कधी दिसेल या प्रश्नावर उत्तर दिलं की त्याच्या फेअरवेल सामन्याचे चित्र हे पॉईंट टेबलवर अवलंबून आहे. चेन्नई सुपर किंग्ज सध्या सहाव्या स्थानावर आहे. त्यांचे सध्या १० सामन्यात १० गुण झाले आहेत.

अश्विन सांगतो की, 'जर चेन्नई पुढच्या तीन सामन्यापैकी दोन सामने गमावतो तर धोनीला चेन्नईत फेअरवेल सामना मिळू शकतो.'

MS Dhoni Latest Update
IPL 2026 | 'धोनी खेळणार का? : CSK vs MI सामन्यापूर्वी आर. अश्विनचे मोठे विधान

लक्ष विचलित होऊ नये म्हणून निर्णय

धोनी जरी अनफिट असली तरी सामन्यावेळी तो संघासोबत देखील दिसत नाही. याबाबत संघाचे कोच माईक हसी यांनी त्याला पडद्यामागं राहायचंय ही धोनीचीच इच्छा आहे. त्याने मुद्दाम काही सामन्यात संघासोबत राहणं टाळलं आहे. हसी म्हणतो की, तो संघाचा विचार करणारा खेळाडू आहे. तो संघासाठी जे उत्तम आहे तेच करतो. तो जर सामन्यावेळी संघासोबत राहिला तर सर्वांचे लक्ष खूपच विचलित होऊ शकते.'

MS Dhoni Latest Update
IPL 2026 | 'माझ्याकडे उत्तरं नाहीत... कोणतंही कारण नाही': लखनौच्या पराभवाच्या 'चौकारा'नंतर ऋषभ पंत नेमकं काय म्हणाला?

चेन्नईची स्थिती काय?

हंगामाच्या सुरूवातीला चेन्नईची पराभवाची मालिकाच सुरू होती. मात्र आता त्यांना काही प्रमाणात बाऊन्स बॅक करत प्ले ऑफच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र त्यांना प्ले ऑफ गाठण्यासाठी उर्वरित सर्व ४ सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे.

जर संघ जिंकत असेल तर स्थैर्यासाठी संघात बदल न करणं योग्य ठरेल. त्यावेळी तुम्हाला भावनिक होऊन निर्णय घेऊन चालणार नाही. त्यामुळं चेन्नईसाठी इकडं आड तिकडं विहीर आहे. अशा परिस्थितीत धोनीचा फेअरवेल सामना आणि ग्रँड निवृत्ती दृष्टीक्षेपात नाही असंच म्हणावं लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news