IPL 2026 | 'धोनी खेळणार का? : CSK vs MI सामन्यापूर्वी आर. अश्विनचे मोठे विधान

रोहित शर्मादेखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सामन्याला मुकण्याची शक्यता
'धोनी खेळणार का? :  CSK vs MI सामन्यापूर्वी आर. अश्विनचे मोठे विधान
'धोनी खेळणार का? : CSK vs MI सामन्यापूर्वी आर. अश्विनचे मोठे विधानPudhari.
Published on
Updated on

IPL 2026 Ravichandran Ashwin on MS Dhoni injury update

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ मधील सर्वात मोठ्या लढतींपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्यापूर्वी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. शनिवारी चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळण्याची शक्यता अश्विनने फेटाळून लावली आहे.

यंदाच्‍या IPL हंगामात धोनीने एकही सामना खेळलेला नाही

धोनी या हंगामात स्नायूंच्या दुखापतीमुळे अद्याप एकही सामना खेळलेला नाही. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यातून धोनी मैदानात परतेल, अशी चाहत्यांना आशा होती. काही दिवसांपूर्वी चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी धोनी पुनरागमनाच्या "खूप जवळ" असल्याचे म्हटले होते, ज्यामुळे समर्थकांमध्ये उत्साह वाढला होता.

'धोनी खेळणार का? :  CSK vs MI सामन्यापूर्वी आर. अश्विनचे मोठे विधान
Ashwin vs Hardik Pandya : अश्विन पंड्यावर भडकला, म्हणाला ‘तू MI चा कर्णधार की CSKचा मदतनीस...’

धोनी आणि रोहित खेळण्याबाबत साशंकता

अश्विनच्या मते धोनी या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. इतकेच नाही तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मादेखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकण्याची शक्यता अश्विनने वर्तवली आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, "मला रोहित शर्माबद्दल खात्री नाही, पण धोनी १०० टक्के खेळणार नाही, असे मला वाटते. तो अचानक मैदानात उतरून धक्का देऊ शकतो, कारण त्याचा स्वभाव तसाच आहे, तरीही तो खेळेल असे मला वाटत नाही."

'धोनी खेळणार का? :  CSK vs MI सामन्यापूर्वी आर. अश्विनचे मोठे विधान
Hardik Pandya CSK Vs MI: चेन्नईकडून 'सर्वात मोठा' पराभव झाल्यावर हार्दिक पांड्यानं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं?

सूर्यकुमार यादवसाठी फॉर्मात परतण्याची सुवर्णसंधी

"मला वाटते रोहितदेखील खेळणार नाही. मात्र, सूर्यकुमार यादवसाठी फॉर्मात परतण्याची ही सुवर्णसंधी आहे, कारण फलंदाजीसाठी यापेक्षा चांगली खेळपट्टी त्याला मिळणार नाही." चेपॉकची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असल्याने सूर्यकुमारला आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवता येईल, असा विश्वास अश्विनने व्यक्त केला.

'धोनी खेळणार का? :  CSK vs MI सामन्यापूर्वी आर. अश्विनचे मोठे विधान
CSK Captaincy | संजू सॅमसन भूषवेल CSKचे कर्णधारपद : आर. अश्विनने वर्तवले भाकीत

सरफराज खानला तिसऱ्या क्रमांकावर संधी द्यावी

दुखापतींशिवाय अश्विनने चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजीच्या क्रमावरही भाष्य केले. आयुष म्हात्रे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर चेन्नईने सरफराज खानला तिसऱ्या क्रमांकावर कायम ठेवावे, माझं एकच सांगणं आहे की, चेन्नईने सरफराज खानला तिसऱ्या क्रमांकासाठी निश्चित करावे. त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरू नका, कारण संजू सॅमसन वगळता तो या मोसमात तुमचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. त्यामुळे त्याचे स्थान तिसऱ्या क्रमांकावर पक्के करा."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news