EURO 2024 : पहिल्याच सामन्यात जर्मनीची धडाकेबाज खेळी, स्कॉटलँन्ड 5-1 ने पराभूत | पुढारी

EURO 2024 : पहिल्याच सामन्यात जर्मनीची धडाकेबाज खेळी, स्कॉटलँन्ड 5-1 ने पराभूत

पुढारी ऑनलाईन डेस्क | EURO 2024 : युरो कप 2024 ला गुरूवारी  उशिरा रात्री सुरूवात झाली. सलामीच्या सामन्यात यजमान जर्मनीने मैदानावर वर्चस्व दाखवत स्कॉटलँन्डचा एकतर्फी 5-1 ने पराभव केला.

सामन्यात जर्मनीच्या फ्लोरिन यविर्ट्झने सामन्याच्या 10 व्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर सामन्यावर जर्मनीने वर्चस्व दाखवत जमाल मुसियाला (19), काई हावेर्डज (45+1), निक्लस फुलक्रग (68), इमर कान (90+3) यांनी गोल डागले. सामन्याच्या 87 व्या मिनिटाला जर्मनीचा डिफेंडर रूडिगरने स्वयंगोल केला. अखेरीस जर्मनीने सामना 5-1 अशा गोल फरकाने जिंकून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मैदानावरील वर्चस्व काय असते? हे कालच्या सामन्यात फुटबॉल चाहत्यांना अनुभवता आलं. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात स्कॉटलँन्डचा पहिला बलाढ्य जर्मनीसोबत झाला. सामन्याच्या सुरूवातीपासून जर्मनीने वेगवाग चाली रचत गोल करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु स्कॉटलँन्ड खेळाडूंनी केलेल्या बचावामुळे जर्मनी गोल करता आला नाही. सामन्याच्या 10 व्या मिनिटाला जर्मनीच्या फ्लोरिन यविर्ट्झने शानदार मैदानी गोल करत जर्मनीचे खाते उघडले. जर्मनीने आपले आक्रमक वाढवले. यानंतर शॉट पासिंगचा अवलंब करत जर्मनीने सामन्याच्या 19 व्या मिनिटाला जमाल मुसियालाने जर्मनीसाठी दुसरा करत 2-0 अशी आघाडी घेतली.

यानंतर जर्मनीच्या खेळाडूंनी खेळ स्लो करत पासिंगवर भर दिला. आधे-मधे जर्मन स्नायपर नावानो ओळखला जाणार टोनी क्रस गोल करण्यासाठी अप्रतिम पासिंग करत होता. पहिला हाफच्या एक्स्ट्रा टाईममध्ये स्कॉटलँन्डच्या खेळाडूने जर्मनीच्या खेळाडूला आक्षेपार्यरित्या डेंजर झोनमध्ये अडवल्यामुळे रेफ्रींनी पेनल्टी चेक करून जर्मनीला पेनल्टी किक बहाल केली. पेनल्टी किकवर काई हावेर्डजने गोल करून जर्मनीला सामन्यात 3-0 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. यावेळी रेफ्रींनी स्कॉटलँन्डचा खेळाडू रायन पोर्टियस रेड कार्ड दाखवले. यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावे लागले.

दुसऱ्या हाफच्या सुरूवातीपासून स्कॉटलँन्डने आपले आक्रमक सुरू केले. त्यांनी गोल रचण्यासाठी अनेक चढाया केल्या परंतु, फिनिशिंग अभावी त्यांना गोलची परतफेड करता आली नाही. यासह जर्मनीच्या भक्कम बचावापुढे स्कॉटलँन्डचा खेळाडूंचे आक्रमण टिकू शकले नाही. दरम्यान जर्मनीने सामन्याच्या 68 मिनिटाला स्कॉटलँन्डच्या गोलपोस्टच्या दिशेन चढाई केली, यावेळी निक्लस फुलक्रगने गोल नोंदवून जर्मनीला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 87 व्या मिनिटाला जर्मनीचा डिफेंडर रूडिगरने स्वयंगोल केला. यामुळे स्कॉटलँन्डच्या खात्यात एका गोलची भर पडली. यानंतर उत्कृष्ट पासिंग करत जर्मनीने एक्स्टा टाईममध्ये इमर कानने (90+3) जबरदस्त फटका मारून संघासाठी पाचव्या गोलची नोंद केली.

Back to top button