odi captaincy : विराटला ‘वनडे’चेही कर्णधारपद गमवावे लागणार? | पुढारी

odi captaincy : विराटला 'वनडे'चेही कर्णधारपद गमवावे लागणार?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

टी-२० विश्‍वचषकानंतर विराट कोहलीला टी-२०चे कर्णधारपद (odi captaincy) सोडावे लागले. आता मागील काही दिवसांपासून अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे की, विराटबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय ) मोठा निर्णय घेणार आहे. लवकरच दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड होणार आहे. यावेळी विराटच्‍या भवितव्‍याचा फैसला ‘बीसीसीआय’ करणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी चेतन शर्मा यांची समिती संघाची निवड करेल. यावेळी विराट कोहलीच्‍या वनडेतील कर्णधारपदावरही
(odi captaincy) निर्णय होण्‍याची असून, वनडे संघाच्‍या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली जावू शकते, असे मानले जात आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा हा निश्‍चित तारखांनाच होणार आहे. मात्र कोरोनाचा नवा व्‍हिरियंट दक्षिण आफ्रिकेतच सापडला आहे. त्‍यामुळे तेथील परिस्‍थितीवर आमची नजर असेल, असे बीसीसीआयच्‍या सूत्रांनी सांगितले.

पुढीलवर्षी भारत केवळ ९ वनडे सामने खेळणार

२०२२ मध्‍ये ऑस्‍ट्रेलियात टी-20 विश्‍वचषक होणार आहे. त्‍यामुळे पुढील वर्षभारत सर्वच संघ हे टी २०चे सर्वाधिक सामने खेळणार आहेत. साहजिकच त्‍यामुळे वनडे सामन्‍यांची संख्‍या घटणार आहे. पुढील वर्षभरात भारतीय संघ केवळ ९ वनडे सामने खेळणार आहे. यामध्‍ये दक्षिण आफ्रिका, इंग्‍लंड आणि भारतात प्रत्‍येकी तीन वनडे सामने होणार आहेत.दक्षिण आफ्रिकेत एकच बायो बबल असेल. या दौर्‍यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जाणार आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघात २० ते २३ खेळाडूंची निवड होण्‍याची शक्‍यता आहे.

odi captaincy : कर्णधारपदावरुन ‘बीसीसीआय’मध्‍ये हाेणार माेठा खल

पुढील वर्षभरात भारतीय संघ वनडेच्‍या केवळ ९ सामने खेळणार आहे. त्‍यामुळे वनडेचे कर्णधारपद विराट कोहली याच्‍याकडेच कायम ठेवावे, असे बीसीसीआयमधील काहींचे मत आहे. रोहित शर्माकडे टी २०चे कर्णधारपद देण्‍यात आले आहे. त्‍यामुळे वनडे कर्णधारपदही त्‍याच्‍याकडेच देण्‍यात यावे.२०२३ भारतात वनडे विश्‍वचषक होणार आहे. त्‍याची तयारी करण्‍यासाठी आतापासूनच रोहितकडे वनडेचे कर्णधारपद देण्‍यात यावे, असे बीसीसीआयमधील काही पदाधिकार्‍यांचे मत आहे. त्‍यामुळे आता वनडे संघाचा कर्णधारपद कोणाकडे द्‍यावे, यासाठी बीसीसीआयमध्‍ये मोठा खल होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

बीसीसीआयच्‍या एका अधिकार्‍याने सांगितले की, पुढील पाच दिवसांमध्‍ये दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड होणार आहे. आम्‍ही आमची तयारी पूर्ण करणार आहोत. यानंतर सरकार या दौर्‍याला परवानगी देणार का, याकडे आमचे लक्ष असेल. सरकारने दौरा रद्‍द करण्‍याचे आदेश दिले तर दौरा रद्‍द होईल. शनिवारी कोलकाता येथे बीसीसीआयची बैठक होणार आहे. यावेळी संघाचे मुख्‍य निवडकर्ता चेतन शर्मा आणि त्‍यांच्‍या समितीला मुदतवाढ देण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button