indian premier league 2022 : यंदाचे आयपीएल भारतातच होणार | पुढारी

indian premier league 2022 : यंदाचे आयपीएल भारतातच होणार

दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) सचिव जय शाह यांनी आपीएल २०२२ ( indian premier league 2022 ) चे आयोजन भारतामध्येच होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आयपीएलमध्ये आणखी दोन संघांची भर पडणार असल्यामुळे स्पर्धा आणखी रोमांचकारी होणार असल्याचे देखिल त्यांनी सांगितले. लवकरच आयपीएलचा मेगा ऑक्शन ( indian premier league mega auction) मध्ये होणारी नवीन समिकरणे पाहण्यासारखी असतील. चैन्नई सुपर किंग्ज संघाद्वारे चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जय शाह यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमात भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन देखिल उपस्थित होते.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे ( indian premier league 2022 ) आयोजन भारता ऐवजी यूएई मध्ये करण्यात आले होते. मागील वर्षी कोराना संकटामुळे संपूर्ण स्पर्धा यूएईमध्ये भरविण्यात आली होती. तसेच यावेळच्या म्हणजे आयपीएल २०२१ चे दुसऱ्या सत्राचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. कोलकाता नाईट रायटर्स यांना पराभूत करुन महेंद्र सिंह धोनी यांच्या नेतृत्त्वाखालीली चेन्नई सुपर किंग्जने यंदाचा हंगाम जिंकला होता.

लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ आयपीएलमध्ये स्पष्ट ( indian premier league 2022 )

आयपीएलमध्यील संघाची आता आठ ऐवजी १० झाली आहे. बीसीसीआयने नवे दोन फ्रॅन्चाईजींना सामील करण्यात आले आहे. लखनऊ आणि अहमदाबाद अशी दोन फ्रॅन्चाईचीं नव्याने सामील झाली आहेत. संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपने ७०९० कोटी रुपयांची बोली लावून लखनऊची फ्रॅन्चाईजी मिळवली आहे. तर सीवीसी कॅपीटल यांनी अहमदाबादची फ्रॅन्चाईजी मिळविण्यासाठी ५६२५ कोटी रुपये मोजले आहेत. गोयंका हे दोन वर्षांसाठी रायझिंग पुणे सुपरजायंटस् या पुणे फ्रॅन्चाईजीचे मालक होते.

Back to top button