Cricketers who turned into Acting : 'हे' क्रिकेटपटू रुपेरी पडद्‍यावरही चमकले... | पुढारी

Cricketers who turned into Acting : 'हे' क्रिकेटपटू रुपेरी पडद्‍यावरही चमकले...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

आपल्‍या देशात क्रिकेट आणि फिल्‍मचे भारी वेड. या क्षेत्रातील दिग्‍गज तरुणाईचे रोलमॉडल ठरतात. त्‍यामुळेच फिल्‍म स्‍टार जेव्‍हा मनोरंजन म्‍हणून क्रिकेट खेळतात तर त्‍यांना उदंड प्रसिद्‍धी मिळते. तर क्रिकेटपटू पडद्‍यावर झळकतात तेव्‍हा त्‍याचीही कमालीची चर्चा होते. भारतीय संघाने १९८३ मध्‍ये क्रिकेट विश्‍वचषकांवर आपली मोहर उमटवली आणि भारतात क्रिकेट लोकप्रियतेचे नवे पर्व सूरु झालं. आतंरराष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धेतील विदेशी मैदानावर भारतीयांनी मिळवलेला हा ऐतिहासिक विजय होता. या विजयाने भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना ग्‍लॅमर मिळालं. यानंतर खर्‍या अर्थाने फिल्‍मस्‍टार इतकीच उदंड लोकप्रियता क्रिकेटपटूंनाही मिळू लागली. १९८३ मधील क्रिकेट विश्‍चचषकावर आधारित बहुचर्चेत ‘८३’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी रिलीज होतोय. यानिमित्त क्रिकेट आणि फिल्‍म जगतच्‍या कनेक्‍शनची चर्चा पुन्‍हा सुरु झाली आहे. तुम्‍हाला माहित आहे का, अनेक क्रिकेटपटू पडद्‍यावरही चकमले आहेत ( Cricketers who turned into Acting ) चला जाणून घेवूया कोण आहेत ते…

क्रिकेटपटू आणि फिल्‍म www.pudharinews

सुनील गावस्‍कर : देशात क्रिकेट लोकप्रिय होण्‍यात सर्वात मोठा वाटा कोणाचा, या प्रश्‍नाचे उत्तर सुनील गावस्‍कर या नावात दडलं आहे. या खेळाडूने केलेले विश्‍वविक्रमी कामगिरीने क्रिकेट खेळात भारताचा दबदबा वाढला. त्‍यांनी तब्‍बल १० हजार धावा पूर्ण केल्‍या. अशी कामगिरी करणारे जगातील ते पहिले खेळाडू होते. गावस्‍कर यांनी क्रिकेटबरोबरच चित्रपटातही आपलं नशीब आजमावलं होतं. सुनील गावस्‍कर यांनी सावली प्रेमाची या मराठी चित्रपटात भूमिका साकारली होती. तर ख्‍यातनाम अभिनेते नसीरुद्‍दीन शाह यांच्‍या मालामाल चित्रपटात त्‍यांनी पाहुणा कलाकाराची भूमिका केली होती. विशेष म्‍हणजे, ‘या दुनियेमध्‍ये थांबायला वेळ कोणाला’ या मराठी गाण्‍याला त्‍यांचा आवाज आहे.

kapil dev in iqbal www.pudharinews

कपिल देव : भारतात ९०च्‍या दशकातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू, अशी कपिल देव यांची ओळख आहे. त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखालील भारतीय संघाने १९८३ विश्‍वचषक पटकावला होता. पहिल्‍या सामन्‍यापासून भारतीय संघ हा विश्‍वचषक जिंकू शकतो, असा आत्‍मविश्‍वास अष्‍टपैलू कपिल देव यांना होता. याचा आत्‍मविश्‍वासच्‍या जोरावर या खेळाडूने संघबांधणी केली. आंतरराष्‍ट्रीय पटलावर भारताला ऐतिहासिक यश मिळवून दिले. त्‍यांनी काही चित्रपटात काम केले. तसेच नसीरुद्‍दीन शाह आणि श्रेयस तळपदे यांच्‍या इक्‍बाल या चित्रपटात त्‍यांनी पाहुणा कलाकाराची भूमिका साकारली होती. ही भूमिका आजही क्रिकेटप्रेमींच्‍या स्‍मरणात आहे.

 योगराज सिंह www.pudharinews

योगराज सिंह : भारतीय क्रिकेट संघातील एकेकाळाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह याचे वडील, अशी योगराज सिंह यांची ओळख आहे. मात्र योगराज सिंह हेही क्रिकेटपटू होते. क्रिकेटबरोबर त्‍यांनी अभिनयाचा छंदही जोपासला. पंजाबी भाषेतील अनेक चित्रपटांमध्‍ये त्‍यांनी भूमिका साकारल्‍या आहेत. फरहान अख्‍तरच्‍या भाग मिल्‍खा भाग या चित्रपटात त्‍यांनी साकारलेली कोचची भूमिका ही सर्वात लोकप्रिय ठरली. या भूमिकेमुळे हिंदी चित्रपटातील अभिनेता अशी ओळख करण्‍यात ते यशस्‍वी ठरले.

अजय जडेजा www.pudharinews

अजय जडेजा : ९०च्‍या दशकातील भारतीय संघातील महत्त्‍वपूर्ण खेळाडू असणारा अजय जडेजा हा नेहमी बॉलिवूडशी जोडलेला होता. भारतीय क्रिकेट संघातून निवृत्त झाल्‍यानंतर त्‍याने पल पल दिल के साथ आणि काय पो छे या चित्रपटात भूमिका साकारली होती. मात्र अजय जडेजा फार काळ बॉलिवूडमध्‍ये रमला नाही.

बाॅलिवूडमध्‍ये नशीबाने साथ दिली नाही. यानंतर अजय जडेजा याने  क्रिकेट समालोचक म्‍हणून आपली नवी भूमिका सुरु केली. आजही जगातील आघाडीच्‍या समालोचकांमध्‍ये अजय जडेजा याचे नाव आहे. मात्र आजही त्‍याने चित्रपट आणि मॉडलिंगमध्‍ये केलेल्‍या कामाची चर्चा होत असते.

विनोद कांबळी www.pudharinews

विनोद कांबळी : सचिन तेंडुलकरबरोबर आपल्‍या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात करणारा खेळाडू, अशी विनोद कांबळी याची ओळख आहे. मात्र कामगिरीमध्‍ये सातत्‍य नसल्‍याने तो भारतीय संघात जास्‍त काळ आपलं स्‍थान निर्माण करु शकला नाही. २००२मध्‍ये विनोद कांबळी याने अनर्थ चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात संजय दत्त, सुनील शेट्‍टी, आशुतोष राणा
यांच्‍याही भूमिका होत्‍या. क्रिकेटपेक्षाही अन्‍य कारणांमुळे विनोद कांबळी नेहमी चर्चेत राहिला आहे.

संदीप पाटील www.pudharinews

संदीप पाटील, सैय्‍यद किरमानी : १९८३च्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेतील भारतीय क्रिकेट संघातील महत्त्‍वपूर्ण खेळाडू, अशी संदीप पाटील आणि सैय्‍यद किरमानी यांची ओळख आहे. त्‍यांनी भारतासाठी केलेली कामगिरी आजही क्रिकेटप्रेमींच्‍या मनात कायम आहे. या दोन्‍ही खेळाडूंनी १९८५ मध्‍ये कभी अजनबी थे या हिंदी चित्रपटात भूमिका साकारली होती.

 सलील अंकोला www.pudharinews

सलिल अंकोला : क्रिकेटपेक्षाही बॉलिवूडशी कनेक्‍ट असणारा खेळाडू अशी सलिल अंकोला याची ओळख होती. त्‍याने भारतीय क्रिकेट संघासाठी केवळ एक कसोटी सामना खेळला. तर केवळ २० वन डे सामने खेळले. त्‍याने संजय दत्त याच्‍या कुरुक्षेत्र चित्रपटहात सहायक अभिनेता म्‍हणून काम केले. तसेच टीव्‍हीवरील काही मालिकांमध्‍येही तो चमकला होता.

हरभजन सिंह www.pudharinews

हरभजन सिंह : सर्वोत्‍कृष्‍ट फिरकी गोलंदाज, अशी हरभजन सिंह याची ओळख आहे. भारतीय संघासाठी अनेक सामन्‍यांमध्‍ये त्‍याने महत्‍वपूर्ण योगदान दिले. फ्रेंडशिप या चित्रपटात त्‍याने भूमिका साकारली. आता तो दाक्षिणात्‍य फिल्‍म इंडस्‍ट्रीत आपले नशीब आजमावणार आहे.

एकुणच भारतीय क्रिकेटपटू आणि चित्रपटसृष्‍टीचे नातं जवळच राहिलं आहे. यापूर्वीही क्रिकेटची कथा सांगणार चित्रपटांना पसंती मिळाली आहे. आता लवकरच ८३ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. बघुया क्रिकेटप्रमींसह सिनेरसिक यांचे कसे स्‍वागत करताय ते.

हेही वाचलं का ?

 

Back to top button