IPL 2024 LSG vs PBKS : लखनऊचे पंजाबला 200 धावांचे आव्हान | पुढारी

IPL 2024 LSG vs PBKS : लखनऊचे पंजाबला 200 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : आज पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात सामना होत आहे. लखनऊ सुपरजायंट्स या संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉक (54), निकोलस पुरन (42) आणि क्रुणाल पंड्या यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर लखनऊने 20 ओव्हरमध्ये 8 फलंदाज गमावून 199 धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये पंजाबच्या सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याच्यासह अर्शदीप सिंगने 2 तर कगिसो रबाडा आणि राहूल चहर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर मोहसिन खानला हर्शल पटेलने धावबाद केले. स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी पंजाबला 200 धावांचे लक्ष्य आहे. (IPL 2024)

आयपीएलच्या 11व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकच्या झंझावाती खेळीच्या जोरावर लखनौने पंजाब किंग्जला 200 धावांचे लक्ष्य दिले. लखनौने 20 षटकांत आठ गडी गमावून 199 धावा केल्या. डी कॉक आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी झाली. अर्शदीप सिंगने राहूलला बाद करत ही जोडी फोडली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला देवदत्त पडिक्कल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. तो जास्त काळ मैदानाववर टिकू शकला नाही. तो 9 धावांवर बाद झाला. तर मार्कस स्टॉइनिसही 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डी कॉक आणि निकोलस पूरन यांच्यात पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी झाली.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्विंटन डी कॉकला अर्शदीप सिंगने बाद केला. पंजाबविरुद्ध त्याने आयपीएल कारकिर्दीतील 21वे अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि दोन षटकार आले. त्याचवेळी या सामन्यात संघाचे नेतृत्व करणाऱ्या पूरणने 42 धावा केल्या. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कृणाल पांड्याने ही आक्रमक फलंदाजी करत 195.45 च्या स्ट्राईक रेटने 43 धावा केल्या. या नाबाद खेळीदरम्यान त्याने केवळ 22 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी रवी बिश्नोईला खातेही उघडता आले नाही. या सामन्यात मोहसीन खानने दोन धावा केल्या तर नवीन उल हक एकही धाव न काढता नाबाद राहिला. पंजाबकडून सॅम कुरनने तीन आणि अर्शदीप सिंगने दोन तर कागिसो रबाडा आणि राहुल चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा

Back to top button