Asian Para Games 2023 : २०० मीटर टी-३७ स्पर्धेत श्रेयांश त्रिवेदीने जिंकले कांस्य
पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताकडून पदकांची लयलूट सुरूच आहे. भारताच्या श्रेयांश त्रिवेदीने पुरुषांच्या २०० मीटर टी -३७ धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. २५.२६ सेकंदात त्याने ही कामगिरी केली.
संबंधित बातम्या :
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची विजयी घोडदौड सुरूच असून पुरुषांच्या २०० मीटर टी ३५ धावण्याच्या स्पर्धेत नारायण ठाकुरने २९.८३ सेकंद नोंदवत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. याच स्पर्धेत रवी कुमार ३१.२८ सेकंदांसह पाचव्या स्थानावर राहिला. (AsianParaGames)
आशियाई पॅरा गेम्समध्ये तिसऱ्या दिवशी भारताने टेबल टेनिसमध्ये खाते उघडले. टेबल टेनिस महिला एकेरी – वर्ग ४ क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले.
भालाफेकमध्ये सुमितने रचला इतिहास; सुवर्णला गवसणी
पॅरा आशियाई स्पर्धेत सुमित अंतिल आणि पुष्पेंद्र सिंग यांनी पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत भारतासाठी २ पदके जिंकली आहेत. सुमितने ७३.२९ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले, तर पुष्पेंद्र सिंगने ६२.०६ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदक पटकावले.
हेही वाचा :