Asian Para Games : महिला 10 M शुटिंग स्‍पर्धेत भारताला कांस्‍य पदक

Asian Para Games : महिला 10 M शुटिंग स्‍पर्धेत भारताला कांस्‍य पदक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमधील हांगझो येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्स स्‍पर्धेत भारताची पदकांची लयलूट सुरुच आहे. आज महिलांच्या १० मीटर पिस्तूलमध्ये भारताच्‍या रुबिना फ्रान्सिसने कांस्य पदक पटकावले. रुबिना फ्रान्सिसने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत 211 गुणांसह धडक दिली होती.

बॅडमिंटनमध्‍ये महिला एकेरीत भारताची उपांत्‍य फेरीत धडक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमधील हांगझो येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्स स्‍पर्धेत भारताची पदकांची लयलूट सुरुच आहे. आज भारताने बॅडमिंटनमध्‍ये आपले तिसरे पदक निश्‍चित केले. महिला एकेरीत मानसी जोशीने उपांत्‍यपूर्व फेरीत चीनच्‍या Liu Yuemei चा पराभव करत उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.

पुरुष गोळाफेकीत रवी रोंगालला रौप्‍य

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमधील हांगझो येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्स स्‍पर्धेत भारताची पदकांची लयलूट सुरुच आहे. रवी रोंगालीने 9.92 मीटरच्या सर्वोत्कृष्ट थ्रोसह पुरुषांच्या गोळाफेक (शॉट पुट) स्पर्धेत रौप्‍य पदक पटकावले आहे.

पुरुष 10M शुटिंग स्‍पर्धेत भारताचा डबल धमाका

चौथ्या आशियाई पॅरा गेम्स स्‍पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर शुटिंग स्पर्धेत भारताने दाेन पदकांवर आपली माेहर उमटवली आहे.  रुद्रांश खंडेलवालने 238.3 गुणांसह राैप्‍य पदकाला गवसणी घातली. तर पॅरालिम्पिक चॅम्पियन मनीष नरवाल याने २१७.३ गुणांसह कांस्‍य पदक पटकावले आहे.

बॅडमिंटनमध्‍ये भारताचे आणखी दोन पदके निश्‍चित

आशियाई पॅरा गेम्स स्‍पर्धेत भारताचे  बॅडमिंटनमधील आणखी एक पदक आज ( दि.२४) निश्‍चित झाले. प्रमोद भगत आणि मनीषा रामदास मिश्र दुहेरीच्या SL3-SU5 उपांत्‍यपूर्व फरीत चमकदार कामगिरी करत उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.
SL3-SU5 मिश्र दुहेरी जोडी प्रमोद भगत/मनीषा रामदास यांनी उपांत्‍यपूर्व फेरीत तैयो इमाई/नोरिको इटो या जोडीचा सरळ गेममध्ये 21-10,22-20 असा पराभव करत भारताचे पदक निश्चित केले.

भारताच्‍या नितेश आजिण तुलासिमाथी जाेडीने दुहेरी उपांत्‍यपूर्व फेरीत चीनच्‍या जोडीचा पराभव केला. या जाेडीने उपांत्‍य फेरीत धडक मारल्‍याने भारताचे बॅडमिंटनमधील पदक निश्‍चित झाले आहे, नितेश कुमार/थुलासिमाथी मुरुगेसन जाेडीने  ?? Jianyuan यांग/Qiuxia Yang चा सरळ गेममध्ये 23-21,21-15 असा पराभव केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news