AsianParaGames : पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या दिप्ती जीवनजीचे ‘सुवर्ण’ यश | पुढारी

AsianParaGames : पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या दिप्ती जीवनजीचे 'सुवर्ण' यश

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये (AsianParaGames) भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या दिप्ती जीवनजीने (Deepthi Jeevanji) सुवर्णपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या ४०० मीटर टी २० क्रीडा प्रकारात तिने भारतासाठी आणखी एक सुवर्ण जिंकले. तिने ५६.६९ च्या धमाकेदार वेळेसह ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील आज (दि.२४) दुसऱ्या दिवशीचे हे दुसरे सुवर्ण पदक आहे.

संबंधित बातम्या : 

दुसऱ्या दिवशीही भारतासाठी पदकांचा वर्षाव

भारताच्या प्राची यादवने आज महिला KL2 कॅनोई स्पर्धेत दिवसाचे पहिले सुवर्ण जिंकले. आशियाई पॅरा गेम्स (AsianParaGames) मधील तिचे हे दुसरे पदक आहे. तर कौरव मनीषने पुरुषांच्या KL3 कॅनोई स्पर्धेत कास्य पदकावर नाव कोरले. अॅथलॅटीक्समध्ये महिला क्लब थ्रो – एफ ३२/५१ स्पर्धेत भारताच्या भ्यान एकता हिने कांस्यपदक मिळवले. २१.६६ मीटर थ्रोसह तिने अविश्वसनीय कौशल्य दाखवले. या स्पर्धेत भारताची पदकांची मालिका कायम आहे. गजेंद्र सिंगने कॅनोई पुरुष VL2 स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. (AsianParaGames)

सोमवारी (दि. 23) भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह १७ पदके जिंकली होती. प्राची यादवने भारताला पहिले पदक मिळवून दिले. तिने कॅनोई VL2 स्पर्धेत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पदकांचा पाऊस पडला. आज दुसऱ्या दिवशीही भारताने सुर्वर्ण सुरूवात केली आहे.

पहिल्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये प्रणव सूरमाने पुरुषांच्या क्लब थ्रो एफ ५१ स्पर्धेत तिन्ही पदके जिंकली. २९ वर्षीय सूरमाने आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम मोडीत काढत ३०.०१ मीटर धावून सुवर्णपदक पटकावले तर धरमबीर (२८.७६ मीटर) आणि अमित कुमार (२६.९३ मीटर) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button