अभिमानास्‍पद..! पॅरा गेम्समध्‍ये भारताचा डंका, दुसर्‍या दिवशी ४ ‘गाेल्ड’सह पटकावली १८ पदके

अभिमानास्‍पद..! पॅरा गेम्समध्‍ये भारताचा डंका, दुसर्‍या दिवशी ४ ‘गाेल्ड’सह पटकावली १८ पदके
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशियाई पॅरा गेम्समध्‍ये दुसऱ्या दिवशी भारताने ४ सुवर्णांसह १८ पदके पटकावली. स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांत भारताची पदकांची संख्या ३५ झाली आहे. भारतीय संघाने यापूर्वी सोमवारी (दि.२३) सहा सुवर्णांसह १७ पदकांची कमाई केली होती. चीन (१५५), इराण (४४) आणि उझबेकिस्तान (३८) यांच्या मागे राहून भारताने एकूण १० सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह पदक तालिकेत चौथे स्थान कायम राखले आहे.

प्राची यादवची अभिमानास्‍पद कामगिरी, पंतप्रधान माेदींनी केले अभिनंदन

प्राची यादव हिने आज ( दि. २४) पॅरा कॅनो व्हीएल2 मध्ये सुवर्णपदकावर मोहर उमटवत दमदार सुरुवात करुन दिली.दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या मालिकेत भारतीय खेळाडूंच्या पदकविजेत्या प्रयत्नांचे कौतुक केले. "पॅरा कॅनोई महिला KL2 स्पर्धेत प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकल्याबद्दल @ItzPrachi चे अभिनंदन. ही अशी अपवादात्मक कामगिरी होती, ज्यामुळे भारताला अभिमान वाटला. पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा," अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिले,

धावण्‍याच्‍या स्‍पर्धांमध्‍ये भारताचे वर्चस्‍व

महिलांच्या T20 प्रकारात 400 मीटर शर्यतीत, दीप्ती जीवनजी हिने 56.69 सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकून एक नवीन खेळ आणि आशियाई विक्रम प्रस्थापित केला. शरथ शंकरप्पा मकनहल्ली याने दृष्टिदोष असलेल्या धावपटूंच्या ५००० मीटर शर्यतीत २०:१८.९० मध्ये शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले.

डिस्कस थ्रो स्पर्धेत भारताचा क्‍लीन स्‍वीप

पुरुषांच्या F54/55/56 डिस्कस थ्रो स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिन्ही पदके जिंकली. नीरज यादवने गेम्स आणि आशियाई विक्रमी ३८.५६ मीटर अंतरासह सुवर्णपदक जिंकले, तर योगेश कथुनिया (४२.१३ मी) आणि मुथुराजा (३५.०६ मी) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

 भारतीय नेमबाजांची चमकदार कामगिरी

पॅरा नेमबाजीमध्ये, रुद्रांश खंडेलवाल आणि मनीष नरवाल यांनी अनुक्रमे P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात रौप्य आणि कांस्यपदक मिळवले, तर रुबिना फ्रान्सिसने P2 महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात कांस्यपदक मिळवले.

मनीष कौरव (पुरुषांची KL3 डोंगी), अशोक (पुरुषांची 65 किलो पॉवरलिफ्टिंग), गजेंद्र सिंग (पुरुषांची VL2 कॅनो), आणि एकता भयान (महिला F32/51 क्लब थ्रो) हे कांस्यपदक विजेते ठरेले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, भारताने उत्कृष्ट कामगिरी करत सहा सुवर्ण पदकांसह एकूण 17 पदके जिंकली आहेत.

पॅरा आशियाई क्रीडा स्‍पर्धेत भारताच्‍या ३१३ खेळाडू सहभागी झाले आहेत. टीम इंडियाचे १०० पदके जिंकण्याचे लक्ष्य आहे. रोइंग, कॅनोईंग, लॉन बाउल, तायक्वांदो आणि अंध फुटबॉलमध्ये प्रथमच भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत.

बॅडमिंटनमध्‍ये भारताची तीन पदके निश्‍चित

आशियाई पॅरा गेम्स स्‍पर्धेत भारताचे  बॅडमिंटनमधील आणखी एक पदक आज ( दि.२४) निश्‍चित झाले. प्रमोद भगत आणि मनीषा रामदास मिश्र दुहेरीच्या SL3-SU5 उपांत्‍यपूर्व फरीत चमकदार कामगिरी करत उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.

SL3-SU5 मिश्र दुहेरी जोडी प्रमोद भगत/मनीषा रामदास यांनी उपांत्‍यपूर्व फेरीत तैयो इमाई/नोरिको इटो या जोडीचा सरळ गेममध्ये 21-10,22-20 असा पराभव करत भारताचे पदक निश्चित केले. भारताच्‍या नितेश आजिण तुलासिमाथी जाेडीने दुहेरी उपांत्‍यपूर्व फेरीत चीनच्‍या जोडीचा पराभव केला. या जाेडीने उपांत्‍य फेरीत धडक मारल्‍याने भारताचे बॅडमिंटनमधील पदक निश्‍चित झाले आहे, नितेश कुमार/थुलासिमाथी मुरुगेसन जाेडीने  ?? Jianyuan यांग/Qiuxia Yang चा सरळ गेममध्ये 23-21,21-15 असा पराभव केला. आज भारताने बॅडमिंटनमध्‍ये आपले तिसरे पदक निश्‍चित केले. महिला एकेरीत मानसी जोशीने उपांत्‍यपूर्व फेरीत चीनच्‍या Liu Yuemei चा पराभव करत उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news