World Cup 2023 | हरभजनचा अश्विनबाबत मोठा दावा; म्हणाला, ‘मी कर्णधार असतो तर अश्विनला…’ | पुढारी

World Cup 2023 | हरभजनचा अश्विनबाबत मोठा दावा; म्हणाला, 'मी कर्णधार असतो तर अश्विनला...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) सध्याचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनबाबत (Ravichandran Ashwin) मोठा दावा केला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने आर अश्विनला विश्वचषकात (World Cup 2023) खेळवले पाहिजे, असे त्याचे मत आहे. “तो संघाचा एक भाग बनला आहे, पण संघात अधिक लेफ्टी फलंदाज असतील तेव्हाच आर अश्विनचा वापर केला जाईल, असे मानले जाते. परंतु त्याला प्रत्येक सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळायला हवी,” असे हरभजनने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या : 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत अक्षर पटेलच्या जागी अश्विनला संधी दिली होती. पहिल्या दोन सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर अक्षर पटेल फिट झाला नसल्याने अश्विनला विश्वचषक (World Cup 2023) संघात अंतिम पंधरामध्ये संधी मिळाली. तरीही संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्माला अजूनही वाटते की, परिस्थितीनुसार २०२३ च्या विश्वचषकातील प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची निवड केली जाईल.

क्रिकइन्फोशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “लोकांना वाटतं कौशल्य अधिक महत्त्वाचे, पण असे नाही; ऑफस्पिनरने उजव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजी करू नये. मी असेही म्हटले की, जर समोरच्या संघात डावखुरे खेळाडू असतील तर अश्विनने खेळावे. व्यवस्थापनाचाही असाच विचार आहे. जर मी संघाचा कर्णधार असतो किंवा व्यवस्थापनाचा भाग असतो तर मी माझे पाच सर्वोत्तम गोलंदाज निवडले असते आणि अश्विन त्या यादीत पहिला किंवा दुसरा असता,” असे हरभजनने म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button