Asian Game 2023 : आठव्या दिवशी भारताची संस्मरणीय कामगिरी! जाणून घ्या पदकतालिकेत कितव्या स्थानी? | पुढारी

Asian Game 2023 : आठव्या दिवशी भारताची संस्मरणीय कामगिरी! जाणून घ्या पदकतालिकेत कितव्या स्थानी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेतील आठवा दिवस (दि.१) गाजवला. दिवसाची सुरूवात नेमबाजीच्या सुवर्ण पदकाने तर शेवट बॅडमिंटनमधील रौप्य पदकाने झाली. आजच्या दिवसात भारतीय खेळाडूनी एकूण १५ इतकी पदके कमवली. यात ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.  (Asian Game 2023)

तत्पूर्वी भारतीय खेळाडूंनी काल (दि.३०) आणि आज केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघ पदतालिकेत चौथ्या स्थानी कायम आहे. आज केलेल्या शानदार कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत एकूण ५३ पदके पटकावली आहेत. जाणून घेवूया आजवरच्‍या भारताच्‍या पदक विजेत्‍या खेळाडूंची कामगिरी

  • टेनिस, मिश्र दुहेरी : रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले. २००२च्या आशियाई स्पर्धेपासून या खेळात सुवर्णपदक जिंकण्याचा भारताचा सिलसिला कायम आहे. (Asian Game 2023)
  • स्क्वॉश : भारतीय महिला स्क्वॉश संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत संघला हाँगकाँगविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. (Asian Games 2023)
  • ॲथलेटिक्स : कार्तिक आणि गुलवीरने पुरुषांच्या १०००० मीटर शर्यतीत इतिहास रचला. पुरुषांच्या १०००० मीटर शर्यतीत कार्तिकने २८:१५.३८ वेळेसह रौप्य पदक पटकावले तर गुलवीरने २८:१७.२१ वेळेसह कांस्य पदक जिंकले. हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अॅथलेटिक्समध्ये तीन पदके जिंकली आहेत. याआधी शुक्रवारी किरण बालियानने शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकले होते. या दोन पदकांसह भारताच्या एकूण पदकांची संख्या 38 झाली आहे.
  • नेमबाजी, महिला १० मीटर एअर रायफल संघ : मेहुली घोष, रमिता आणि आशी चौकसी या संघाने महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून रौप्य पदक जिंकले.
  • रोइंग पुरुष दुहेरी स्कल्स : अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग या जोडीने लाइटवेट पुरुष दुहेरी स्कल्समध्ये रौप्य पदक जिंकले.
  • रोइंग, पुरुषांची जोडी : लेख राम आणि बाबू लाल यादव या जोडीने तिसरे स्थान पटकावत कांस्यपदक जिंकले. (Asian Games 2023)
  • रोइंग, पुरुष : रोईंगमध्ये पदकांची घोडदौड सुरू ठेवत भारताने या वेळी पुरुषांच्या स्पर्धेत आणखी एक रौप्य पदक जिंकले.
  • नेमबाजी, महिला १० मीटर एअर रायफल वैयक्तिक : महिला सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या रमिता जिंदालने १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत २३०.१ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
  • नेमबाजी, पुरुषांची १० मीटर एअर रायफल टीम : दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर या त्रिकुटाने यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. १८९३.७ च्या स्कोअरसह, त्यांनी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत संघाचा विद्यमान विश्वविक्रम मोडला.
  • रोइंग, पुरुष कॉक्सलेस : जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनीत आणि आशिष कुमार यांनी कॉक्सलेस चारमध्ये तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले.
  • रोइंग, पुरुष क्वाड्रपल : रोईंगमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले. सतनाम, परमिंदर, जाकर आणि सुखमीत या चौघांनी अंतिम फेरीत ३:६.०८ मिनिटांच्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले.
  • पुरुषांची १० मीटर एअर रायफल वैयक्तिक : नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने इतर दोघांसह भारताला सांघिक स्पर्धेत आशियाई स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
  • पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल संघ : आदर्श सिंग, अनिश भानवाला आणि विजयवीर सिद्धू यांनी एकूण १७१८ गुणांसह भारतासाठी कांस्यपदक जिंकले.
  • महिला क्रिकेट : भारतीय संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकले. आशियाई स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदाच सहभागी झाला होता. पहिल्याच प्रयत्नातच सुवर्णपदक जिंकण्यात टीम इंडियाला यश आले आहे.
  • नौकानयन : १७ वर्षीय नेहा ठाकूरने रौप्य पदक जिंकले. तिने मुलींच्या डिंगी ILCA4 स्पर्धेत शर्यतीमध्ये २७ गुण मिळवले.
  • नौकानयन : इबाद अलीने नौकानयनात कांस्यपदक जिंकले. त्याने पुरुषांच्या विंडसर्फर आरएस एक्स स्पर्धेत ५२ च्या निव्वळ स्कोअरसह तिसरे स्थान पटकावले.
  • घोडेस्वार संघ : हृदय छेडा, दिव्याकृती सिंग, अनुष अग्रवाल आणि सुदीप्ती हजेला यांच्या भारतीय मिश्र संघाने २०९.२०५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
  • ५० मीटर थ्री पोझिशन रायफल टीम : भारताने ५० मीटर थ्री पोझिशन सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे आणि मानिनी कौशिक यांच्या संघाने स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.
  • २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धा : भारताने सुवर्णपदकावर कब्जा केला आहे. मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यांनी चीनला तीन गुणांनी हरवले. भाकरने दोन गुणांच्या आघाडीसह फेरीला सुरुवात केली.
  • ५० मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक : भारतीय खेळाडू नेमबाजीत चमकदार कामगिरी करत आहेत. भारताच्या साम्राने स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. साम्राने ५० मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक स्पर्धेत १०.२ गुण मिळवून सहज सुवर्णपदक जिंकले.
  • ५० मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक: सिफ्टने ५० मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर त्याच स्पर्धेत आशी चौकसेने कांस्यपदक जिंकले.
  • भारतीय पुरुष स्कीट नेमबाजी : भारतीय पुरुष स्कीट नेमबाजी संघाने कांस्य पदक जिंकले. अंगद बाजवा, गुरज्योत सिंग खंगुरा आणि अनंत जीत सिंग नारुका या त्रिकुटाने एकूण ३५५ गुण मिळवले आणि अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले.
  • सेलिंग ILCA 7 पुरुष : विष्णू सरवननने पुरुषांच्या डिंगी ILCA 7 मध्ये ३४ निव्वळ स्कोअरसह कांस्यपदक जिंकले.
    महिला २५ मीटर पिस्तूल : ईशा सिंगने नेमबाजीत रौप्य पदक जिंकले. तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत ३४ गुण मिळवले आणि दुसरी राहिली.
  • शॉटगन स्कीट, पुरुष : अनंत नाकुराने पुरुषांच्या शॉटगन स्कीटमध्ये रौप्यपदक जिंकले. अनंतने ६० प्रयत्नांपैकी ५८ अचूक शॉट्स केले.
    वुशु , महिला : रोशिबिना देवीने महिलांच्या ६० किलो वुशू सांडामध्ये रौप्य पदक जिंकले.
  • पुरुष १० मीटर एअर पिस्तूल : सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा आणि शिव नरवाल यांच्या पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल संघाने चीनचा एका गुणाने पराभव केला. भारताने १७३४ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
  • घोडेस्वार, वैयक्तिक ड्रेसेज : अनुष आणि त्याचा घोडा इट्रो यांनी वैयक्तिक ड्रेसेजमध्ये तिसरे स्थान मिळवले आणि ७३.०३० गुणांसह कांस्यपदक जिंकले.
  • नेमबाजी : १० मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत भारताने रौप्य पदक जिंकले. भारतीय महिला संघाच्या खेळाडू ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. या तिघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चालू आवृत्तीत देशाला २६ वे पदक मिळवून दिले. ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांचा संघ १७३१-५० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चीनच्या रँक्सिंग, ली आणि नान या जोडीने सुवर्णपदक पटकावले.
  • शुटिंग : ऐश्वर्या प्रताप सिंग, स्वप्नील आणि अखिल या त्रिकुटाने आश्चर्यकारक कामगिरी केली. तिघांनी मिळून ५० मीटर रायफल ३ पोझिशन पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिघांनी मिळून १७६९ गुण मिळवले. चीनच्या लिनशु, हाओ आणि जिया मिंग या जोडीला रौप्यपदक मिळाले. त्याचवेळी कोरियाच्या खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले.
  • टेनिस : टेनिसच्या पुरुष दुहेरी स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवले. साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन या जोडीचा अंतिम फेरीत पराभव झाला. दोघांनाही रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
  • नेमबाजी : पलकने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर ईशा सिंगने रौप्य पदक जिंकले. पाकिस्तानच्या किश्माला तलतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पलकने २४२.१ आणि ईशानने २३९.७ गुण मिळवले. तर, किश्मलाने २१८.२ गुण मिळवले. (Asian Game 2023)
  • नेमबाजी : ऐश्वर्या प्रताप सिंगने सांघिक स्पर्धा जिंकून पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये रौप्य पदक जिंकले. ऐश्वर्याने ४५९.७ गुण मिळवले.
  • ट्रॅक अँड फील्ड (गोळा फेक) : किरण बालियानने शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याने तिसऱ्या प्रयत्नात १७.३६ मीटर फेक करून पदक जिंकले. अ‍ॅथलेटिक्समध्ये म्हणजे ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. मेरठच्या किरण बालियानने ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताचे खाते उघडले.
  • नेमबाजी, मिश्र दुहेरी, १० मीटर एअर पिस्तूल : सरबजोत आणि दिव्याच्या जोडीने रौप्य पदक जिंकले. चीनने अंतिम सामना १६-१४ अशा फरकाने जिंकला. या स्पर्धेतील नेमबाजीतील भारताचे हे आठवे रौप्यपदक आहे.
  • गोल्फ : अदिती अशोकने महिलांच्या गोल्फ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
  • नेमबाजी, महिला ट्रॅप संघ : महिला ट्रॅप संघाने रौप्य पदक जिंकले. मनीषा कीर, राजेश्वरी कुमारी आणि प्रीती राजक यांनी 337 धावा केल्या. चीनच्या संघाने 355 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले.
  • नेमबाजी, पुरुष संघ : पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत किनान चेनई, जोरावर सिंग आणि पृथ्वीराज तोंडीमन यांच्या संघाने 361 धावा केल्या आणि सुवर्णपदक जिंकले.
  • ट्रॅप नेमबाजी : कीनन चेनईने पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले
  • बॉक्सिंग, महिला : निखत जरीनने बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.
  • 3000 मीटर : अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
  • शॉट पुट (गोळा फेक) : तजिंदरपाल सिंग तूरने गोळाफेकमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. त्याने सलग दुसऱ्यांदा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
  • ​​महिला 1500 मीटर शर्यत : हरमिलन बेन्सने महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत भारतासाठी रौप्य पदक जिंकले.
  • पुरुष 1500 मीटर शर्यत : पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत भारताला दोन पदके मिळाली. अजय कुमार सरोजने रौप्य पदक जिंकले. तर जॉन्सनने कांस्य पदकावर मोहर उमटवली.
  • लांब उडी : मुरली श्रीशंकरने लांब उडीमध्ये रौप्य पदक जिंकले. श्रीशंकरने 8.19 मीटर उडी मारून दुसरा क्रमांक पटकावला.
  • हेप्टॅथलॉन : नंदिनी अगासराने 800 मीटर हेप्टॅथलॉनमध्ये कांस्यपदक जिंकले.
  • डिस्कस थ्रो : भारताच्या सीमा पुनियाने डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले. तिने 58.62 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले. तर चीनच्या बिन फेंगने सुवर्णपदक जिंकले. (Asian Game 2023)

हेही वाचा :

Back to top button