Pakistan Squad for ICC World Cup 2023 | वर्ल्डकपसाठी पाकिस्तान टीमची घोषणा, नसीम शाहला धक्का | पुढारी

Pakistan Squad for ICC World Cup 2023 | वर्ल्डकपसाठी पाकिस्तान टीमची घोषणा, नसीम शाहला धक्का

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेसाठी आज पाकिस्तान संघाची घोषणा केली. पाकिस्तानने वेगवान गोलंदाज नसीम शाह याला दुखापतीमुळे ICC क्रिकेट विश्वचषकाच्या संघातून वगळले आहे. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Pakistan Squad for ICC World Cup 2023)

 संबंधित बातम्या 

नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता. नसीम शाह पाकिस्तान संघात पदार्पण केल्यापासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत दोनवेळा पाच विकेट्ससह १६.९६ च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. पण आता तो संघाबाहेर गेला आहे.

बाबर आझम सोबतच विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद आणि सलमान आगा या खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय हरिस आणि मधल्या फळीतील फलंदाज सौद शकील यानाही संघात स्थान देण्यात आले आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात शादाब खान आणि मोहम्मद नवाज हे दोन फिरकी गोलंदाज आहेत.

विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ , हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

हे ही वाचा :

 

Back to top button