SRH vs KKR : केकेआरचे हैदराबादसमोर १७२ धावांचे आव्हान | पुढारी

SRH vs KKR : केकेआरचे हैदराबादसमोर १७२ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलमध्ये २०२३ च्या हंगामातील ४७ वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद आमने-सामने आहेत. दरम्यान, केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या केकेआरने १७१ धावा केल्या असून हैदराबादसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे.

नितेश राणाच्या ३१ चेंडूमध्ये ४२ धावा आणि रिंकू सिंगच्या ३५ चेंडूमध्ये ४६ धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआर ही धावसंख्या उभारली आहे. केकेआरकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आलेले नाही. नितेश राणा आणि रिंकू सिंग शिवाय कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. हैदराबादकडून मार्को जेन्सन आणि टी नटराजनने प्रत्येकी २ तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, मयांक मार्कंडे आणि अॅडम मार्करमने प्रत्येकी १ विकेट पटकावली आहे.

Back to top button