पाकिस्तानी क्रिकेटरला शुभेच्छा दिल्यानंतर उर्वशी होतेय ट्रोल | पुढारी

पाकिस्तानी क्रिकेटरला शुभेच्छा दिल्यानंतर उर्वशी होतेय ट्रोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ग्लॅमरच्या दुनियेशी जोडली गेली असली तरी क्रिकेट विश्वात तिचे नाव नेहमीच चर्चेत असते. पूर्वी ती भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतमुळे चर्चेत असायची. मात्र ती आता पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह याच्याशी असलेल्या संबंधांमुळे चर्चेत आली आहे. (Urvashi Rautela)

उर्वशी रौतेलाने दिल्या शुभेच्छा

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याने १५ फेब्रुवारीला २० वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांच्या प्रियजनांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये उर्वशीनेही नसीमला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याची संधी सोडली नाही. (Urvashi Rautela)

नसीम शाह याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नसीमसोबत शादाब खानही आहे. उर्वशीने या फोटोवर नसीम शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वशीने लिहिले की, ‘हॅपी बर्थडे नसीम शाह. यानंतर नसीम शाह याने देखील तिचे आभार मानले आहेत.

नसीम शाह म्हणाला मी उर्वशीला ओळखत नाही

उर्वशी आणि नसीम शाह यांची नावे एशिया कप २०२२ पासून घेतली जात आहेत. त्यावेळी नसीम शाह उर्वशीच्या रीलमध्ये दिसला होता. यानंतर नसीमला याबाबत विचारले असता तो म्हणाला की, मी तिला ओळखत नाही.

लोकांनी केले उर्वशीला ट्रोल

उर्वशीने नसीम शाहच्या पोस्टवर कमेंट करताच यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी उर्वशीने ही कमेंट डिलीट केल्याचा आरोप अनेक यूजर्सनी केला आहे. परंतु तिने ही कमेंट डिलीट केलेली नाही.

हेही वाचा;

Back to top button