RCB च्या लाजीरवाण्या पराभवानंतर दीपिका पदुकोनचे ते ट्विट व्हायरल | पुढारी

RCB च्या लाजीरवाण्या पराभवानंतर दीपिका पदुकोनचे ते ट्विट व्हायरल

नवी दिल्ली; पुढारी आनलाईन : नुकतचं उर्वरीत सामन्यांसाठी आयपीएल पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, काल कोलकाता नाईट रायडर्ससोबत झालेल्या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगलोरला (RCB) लाजिरवाना पराभव स्विकारावा लागला. याच पार्श्वभूमिवर सध्या अभिनेत्री दिपीका पदुकोनचे एक ट्विट व्हायरल होत आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची (RCB) सुरुवात निराशाजनक झाली आहे. बंगळुरूचे फलंदाज अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आणि संघ ९२ धावांवर सर्वबाद झाला. आरसबीच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर अभिनेत्री दीपिकीचे ११ वर्षाचे टि्वट व्हायरल होत आहे.

“११ वर्षापूर्वी दीपिकीने ९२ हा काय स्कोर आहे का? असा सवाल करत मी तुमच्यासोबत आहे. प्रत्येक क्षण पाहत आहे.”
खरतर हे टि्वट दिपीकाने राजस्थान रॉयल्ससाठी केले होते. तेव्हा आरसीबीविरूद्ध आरआरने केवळ ९२ धावा केल्या होत्या. तेव्हा आरसीबीने बिनबाद सामना जिंकला होता. तेव्हा दीपिका आरसीबी संघाला चिअरअप करण्यासाठी मैदानात पोहचली होती.

दिपीकाची व्हायरल होणारी पोस्ट २०१० ची असून नेटकऱ्यांनी ही पोस्ट उचलून धरली आहे. रिटि्वट करत कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने या सामन्यात विराटसेनेला ९ गड्यांनी सहज मात दिली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र विराटचा हा निर्णय पूर्णपणे फसला.

दरम्यान, दोनदिवसापूर्वी विराटने आरसीबीच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात विराट म्हणाला, ”आयपीएलमध्ये आरसीबीसाठी कर्णधार म्हणून हा माझा शेवटचा हंगाम असेल. मी माझ्या शेवटच्या आयपीएल सामन्यापर्यंत आरसीबीसाठी खेळत राहीन. चाहत्यांनी विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

विराटच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचबरोबर विराटनंतर आरसीबीचा कर्णधार कोण असेल हा महत्त्वाचा प्रश्न किक्रेट जगतात उपस्थित झाला आहे.

हेही वाचलत का :

अभिनेत्री अदिती सारंगधरने बनवला फक्कड चहा

Back to top button