kolhapur muncipal corporation : कोल्हापूरकर पाणी साठवून ठेवा एवढे दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

kolhapur muncipal corporation : कोल्हापूरकर पाणी साठवून ठेवा एवढे दिवस पाणी पुरवठा राहणार बंद
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : kolhapur muncipal corporation बालिंगा फिल्टर हाऊसमध्ये नवीन बसविण्यात आलेल्या ३०० एचपी व्हर्टीकल टर्बाईन पंपाची डिलीव्हरी लाईन मेन रायझिंग लाईनला गुरूवारी जोडण्यात येणार आहे. परिणामी गुरुवारी (दि. २३) बालिंगा व नागदेववाडी अशुध्द, शुध्द जल उपसा केंद्राकडील पाणी उपसा बंद रहाणार आहे. (kolhapur muncipal corporation)

बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असणा-या ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी वसाहत परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक परिसर आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर,

या भागात राहणार पाणीपुरवठा बंद

क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजी पेठ परिसर, चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर,

बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भाग इत्यादी भागात तसेच सी डी वॉर्ड दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वर पेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवार पेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर,

पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवार पेठ चौक परिसर, सोमवार पेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवलक्लब परिसर इत्यादी परिसरात व ई वॉर्ड खानविलकर पेट्रोलपंप परिसर,

शाहुपूरी ५, ६, ७ व ८ वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागामध्ये दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

गुरुवारी जलवाहिन्या रिकाम्या असल्याने शुक्रवारी (दि. 24) या भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागातील नागरीकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी महापालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जाणार आहे.

नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news