दीपिका पदुकोन पी. व्ही. सिंधू सोबत गाळत आहे घाम! | पुढारी

दीपिका पदुकोन पी. व्ही. सिंधू सोबत गाळत आहे घाम!

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरले. या पदक विजेत्यांच्या टेनिसपटूची अनेक सेलिब्रेटींनी पदक जिंकल्यानंतर भेट घेतली. मात्र दीपिका पदुकोन याबबातीत वेगळी ठरली. तिने पी. व्ही. सिंधूबरोबर थेट बॅडमिंटन कोर्टवर घाम गाळला.

दीपिका पदुकोनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दीपिका पदुकोन पी. व्ही. सिंधू सोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. दीपिकाने या फोटोला ‘एक सर्वसाधारण दिवस… पी. व्ही. सिंधूसोबत घाम गाळत आहे.’ असे कॅप्शन दिले.

दीपिका ही प्रसिद्ध बॅडमिंटन प्रकाश पदुकोन यांची कन्या आहे. त्यामुळे तिने लहान वयातच बॅडमिंटनचे धडे गिरवले आहेत.

आता दीपिका पदुकोनने पी. व्ही. सिंधूबरोबर बॅडमिंटनमध्ये हात आजमावण्याचा अजून एक अर्थ निघू शकतो. काही महिन्यापूर्वीच प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावरचा बायोपिक प्रदर्शित झाला होता. आता पी. व्ही. सिंधूच्या बायोपिकची तयारी तर सुरु नाही ना?.. सिंधूची भुमिका दीपिका साकारणार नाही ना?… असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देऊ शकेल.

हेही वाचले का?

Back to top button