FIFA WC Round Of 16 : आजपासून रंगणार ‘राऊंड ऑफ १६’चा थरार | पुढारी

FIFA WC Round Of 16 : आजपासून रंगणार 'राऊंड ऑफ १६'चा थरार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील ग्रुप स्टेजमधील सामन्यांनंतर आजपासून राऊंड ऑफ १६ फेरीला सुरूवात होत आहे. या फेरीतील सामन्यातील पूर्ण वेळत (९० मिनिट) दोन्ही संघाचा गोल बरोबरीत राहिल्यास सामन्यातील विजयी संघ निवडण्यासाठी आणखी ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जातो. या अतिरिक्त वेळेतही गोलफरक बरोबर राहिल्यास सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटने घेतला जातो. पेनल्टी शुट आऊटच्या गोल फरकावरून सामन्यातील विजयी संघ निश्चित केला जातो. (FIFA WC Round Of 16)

एका दिवसात दोन सामने

राऊंड ऑफ १६ फेरीचे एका दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता आणि दुसरा सामना रात्री १२.३० वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. ग्रुप स्टेजमधील ३२ संघांपैकी प्रत्येक गटातून दोन संघ राऊंड ऑफ १६ फेरीसाठी पात्र ठरले आहेत (FIFA WC Round Of 16)

असे होतील Round Of 16 मधील सामने

 

३ डिसेंबर :

  • नेदरलँड विरुद्ध यूएसए रात्री ८.३० वाजता
  • अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया रात्री १२.३० वाजता

४ डिसेंबर :

  • फ्रान्स विरुद्ध पोलंड रात्री ८.३० वाजता
  • इंग्लंड विरुद्ध सेनेगल रात्री १२.३० वाजता

5 डिसेंबर :

  • जपान विरुद्ध क्रोएशिया रात्री ८.३० वाजता
  • ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया रात्री १२.३० वाजता

६ डिसेंबर :

  • मोरोक्को विरुद्ध स्पेन रात्री ८.३० वाजता
  • पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड रात्री १२.३० वाजता

हेही वाचा;

Back to top button