Predator Drone : भारत खरेदी करणार ‘प्रिडेटर ड्रोन’ : चीनवर पाळत ठेवण्यासाठी होणार वापर | पुढारी

Predator Drone : भारत खरेदी करणार 'प्रिडेटर ड्रोन' : चीनवर पाळत ठेवण्यासाठी होणार वापर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : हिंद महासागरात चीनच्या कारवायांवर पाळत ठेवण्यासाठी भारत अमेरिकाकडून ‘प्रिडेटर ड्रोन’ (Predator Drone) खरेदी करणार आहे. शनिवारी नौदल दिनाच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषदेला संबोधित करताना नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी ही माहिती दिली.

प्रलंबित प्रस्तावानुसार लष्कराच्या तिन्ही दलाला १० ड्रोन (Predator Drone) मिळण्याची शक्यता आहे, असे नौदल प्रमुख म्हणाले. अमेरिकेकडून ३ अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक किमतीचे ३० एमक्यू-९८ प्रिडेटर ड्रोन खरेदीची प्रक्रिया प्रलंबित आहे. विशेष म्हणजे याच ड्रोनच्या सहाय्याने हेलफायर मिसाईलला लॉन्च करीत अल् कायदाचा दहशतवादी अल्-जवाहिरी चा खात्मा करण्यात आला होता.

हिंद महासागरात बरेच चीनी जहाज आहेत. यातील ४ ते ६ पीएलए चे तर काही इतर जहाज आहेत. हिंद महासागर क्षेत्रातील मोठ्या संख्येत असलेली चीनी जहाजांचा मासेमारीसाठी वापर केला जातो. या सर्व हालचालीवर भारताचे लक्ष असल्याचे नौदल प्रमुख म्हणाले. या भागात जवळपास ६० इतर अतिरिक्त क्षेत्रीय बल सदैव तैनात असते. हे एक महत्त्वपूर्ण क्षेत्र असून मोठ्या संख्येत व्यापारासाठी याचा वापर केला जातो. समुद्र सीमेत देशाच्या हिताचे संरक्षण करणाचे काम प्रामुख्याने केले जात असल्याचे ॲडमिरल आर. हरीकुमार म्हणाले.

आयएनएस-विक्रांतमुळे आमचा आत्मविश्वास दर्शवतो

नौदलात आयएनएस विक्रांत समाविष्ठ झाल्याने ही देशाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक घटना आहे. आयएनएस-विक्रांत आत्मनिर्भरतेची मशाल वाहक आहे. विमानवाहक जहाज बनवण्याची क्षमता असलेले बरेच कमी देश असून भारत या निवडक देशांपैकी एक असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. आयएनएस-विक्रांत देशाच्या स्वदेशी क्षमतेचे प्रतीक असून आमचा आत्मविश्वास दर्शवतो. यामुळे जगात देशाची उंची वाढली आहे. येत्या काळात विक्रांत हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात गर्वाने तिरंगा फडकवेल, असा विश्वास नौदल प्रमुखांनी व्यक्त केला. देशाच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहक जहाज आयएनएस विक्रांतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोच्ची येथे कमिशन केले होते. नौदलानेचे नेतृत्व, योजनकार, शिपर्याड श्रमिक, उद्योग तसेच इतर सहाय्यक एजन्सीच्या अथक प्रयत्नांचे दर्शक असल्याचे ते म्हणाले.

Predator Drone : अग्निवीरांच्या पहिल्या बॅचमध्ये ३४१ महिला

अग्निवीरांच्या पहिल्या बॅचमध्ये ३ हजार अग्निवीर नौदलात भरती झाले आहेत. यात ३४१ महिला आहेत. महिला अधिकाऱ्यांना सर्वच शाखेत समाविष्ट करण्यासंबंधी विचारविनिमय सुरू असल्याचे नौदल प्रमुख म्हणाले. आतापर्यंत केवळ सात ते आठ विभागांपुरत्याच महिला मर्यादीत होत्या. पहिल्यांदाच महिलांना पुरूषांच्या समकक्षाप्रमाणे समाविष्ठ केले जात आहे. महिलांना जहाज, एअरबेस तसेच विमानांवर तैनात केले जाईल. त्यांना प्रत्येक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाईल. महिलांच्या प्रशिक्षणामुळे कुठलेही अंतर राहणार नाही, असे नौदल प्रमुख म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button