माझ्‍यावर टीका करण्याची स्पर्धाच लागलीय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra Winter Session
Maharashtra Winter Session

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात होत असलेला विकास विरोधकांना पचत नसल्यानेच  राज्‍य सरकारसह माझ्यावर टीका करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे, असा टोला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांना लगावला. ठाणे महापालिकेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ आज ( दि. ३ ) ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. शिंदे म्‍हणाले, "मुख्यमंत्री कोण होईल याची उत्सुकता सर्वाना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मला संधी दिली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले.  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, मात्र राज्यात होत असलेला विकास विरोधकांना पचत नसल्यानेच सरकारवर आणि माझ्यावर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे. सर्वाना विकासकामानेच उत्तर देणार आहोत "

उद्योग बाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र एखादा मोठा उद्योग हा एका महिन्यात बाहेर जात नसतो. मुख्यमंत्री आला काय गेला काय ही कोणाला चिंता नसते. मात्र नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मी झोपतो कधी यांची चिंता विरोधकांनी करू नये असेही त्यांनी सांगितले.

कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला. ते सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे असतील. सिंचनाच्या बंद पडलेल्या १६ योजना सुरु केल्या आहेत. उदयोग क्षेत्रात २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे, त्यामुळेच राज्याचा विकास होत असल्याने त्यांना हा विकास पचत नसल्यानेच माझ्यावर टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

ठाण्यात येणाऱ्या आयुक्तांची पुढची दलाने उघडी होतात…

ठाणे महापालिका आयुक्त अभिजत बांगर यांनी नवी मुंबईत माझी अपेक्षा पूर्ण केली म्हणून त्यांना ठाण्याची जबाबदारी दिली. तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील राज्याच्या महत्वाचा उद्योग विभाग एमआयडीसी देण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात जे आयुक्त म्‍हणून येतात त्यांची पुढची दालने उघडी होत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news