Sagar Dhankar Murder Case : सागर धनखर हत्या प्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारसह 17 जणांवर आरोप निश्चित

Sagar Dhankar Murder Case : सागर धनखर हत्या प्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारसह 17 जणांवर आरोप निश्चित
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sagar Dhankar Murder Case : कुस्तीपटू सागर धनखर हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर यत आहे. या प्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि अन्य 17 जणांवर आरोप निश्चित केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यातील दोन आरोपी फरार आहेत. या सर्वांवर खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर सभा आणि इतर कलमांखाली गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

कुस्तीपटू सागर धनखरचे (वय 23, रा. सोनीपत) सुशील कुमार आणि इतर कुस्तीपटूंनी 4 मे 2021 च्या रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममधून कथितरित्या अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. ज्यात सागरचा मृत्यू झाला. या मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी अथक परिश्रमानंतर कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. सध्या दिल्ली न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news