पुढारी ऑनलाईन डेस्क : वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यांच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. 30 वर्षीय चाहरचा स्टँड बायमध्ये समावेश करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी 20 मालिकेत तो दुखापतग्रस्त झाला होता. सध्या तो बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. (Team India Deepak Chahar ruled out of T20 World Cup 2022)
रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडणारा दीपक चहर (Deepak Chahar) हा तिसरा खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या काही सामन्यांमध्ये त्याने नवीन चेंडूने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, त्यावरून तो बुमराहच्या जागी खेळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार मोहम्मद शमीने एनसीएमध्ये फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे आणि तो ऑस्ट्रेलियाला जाण्यास तयार आहे. लवकरच बुमराहच्या जागी त्याच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरही ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचे समजते आहे. (Team India Deepak Chahar ruled out of T20 World Cup 2022)
भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेनंतर टीम इंडियाचा दुसरा संघ आता ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, तीन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याची बातमी आहे. याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आलेले नसले तरी तीन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. हा संघ ऑस्ट्रेलियात आल्यानंतर भारताकडे एकूण 15 खेळाडू असतील. मात्र, स्टँडबाय खेळाडूंपैकी श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई अद्याप ऑस्ट्रेलियाला जात नसल्याची बातमी आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागा कोणता खेळाडू घेईल याबद्दल सतत्याचे चर्चा होत होती. मात्र, यात मोहम्मद शमीचे नाव आघाडीवर होते. पण त्याच्या फिटनेसबाबत काही गोष्टी समोर आल्या होत्या, त्यानंतर त्याला एनसीएमध्ये पाठवण्यात आले होते. आता असे वृत्त आहे की मोहम्मद शमीने त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे आणि आता तो बुमराहच्या जागी टी 20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार असल्याचे समजते आहे. परंतु बीसीसीआयने अद्याप याची घोषणा केलेली नाही. त्याचवेळी, दीपक चहरची दुखापत गंभीर आहे, म्हणजेच तो आता वर्ल्डकपला मुकणार आहे. त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आले नसले तरी तो स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत होता. मात्र तो आता ऑस्ट्रेलियाला जाऊ शकणार नाही. दरम्यान, आधीच स्टँडबाय असलेला शमी बुमराहची जागा घेणार असल्याची बातमी आहे. तर दुसरीकडे आता स्टॅम्डबाय खेळाडूंच्या यादीतही बदल झाल्याचे समजते आहे. यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त आहे. (T20 World Cup)
दरम्यान, स्टँडबाय खेळाडू असलेले श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई अद्याप ऑस्ट्रेलियाला जाणार नसल्याचेही वृत्त आहे. मात्र ते का जात नाहीत याबाबत चित्र स्पष्ट होत नाही. श्रेयस अय्यर सध्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळत होता. काल (दि. 11) झालेल्या तिस-या आणि शेवटच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. या मालिकेतील अय्यरने चमकदार कामगिरी केली. दुस-या सामन्यात त्याने झुंझार शतक फटकावले.
दरम्यान, टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी 23 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याला अजून एक आठावड्याहून अधिक कालावधी आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई हे दोन्ही खेळाडू येणा-या काही दिवसांत ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत बीसीसीआयकडून कधी अपडेट येते हे पाहावे लागेल. (Team India Deepak Chahar ruled out of T20 World Cup 2022)