Team India : टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू बनला संघावर ओझे! निवडकर्त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह | पुढारी

Team India : टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू बनला संघावर ओझे! निवडकर्त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात खेळली जाणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा काही दिवसांत सुरू होणार आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यासाठी टीम इंडिया आधीच ऑस्ट्रेलियाच्या भूमीत पोहोचली आहे. येथे भारतीय संघाने सोमवारी (दि. 10) वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळला. भारतीय संघाने हा सामना 13 धावांनी जिंकला. पण या सामन्यात टीम इंडियाच्या काही खेळाडूंची कामगिरी फारशी खास नव्हती. यातील एक खेळाडू म्हणजे स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत. (t20 world cup 2022 rishabh pant bad performance team india)

पंत टी 20 फॉरमॅटमध्ये ठरतोय अपयशी

ऋषभ पंत टी 20 फॉरमॅटमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतबाबत प्रयोग करण्यात आले. त्याला कधी सलामीला तर कधी मधल्या फळीत फलंदाजीची संधी देण्यात आली. पण पंतने निराशा केली. सोमवारी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार रोहित शर्मासोबत पंत सलामीला मैदानात उतरला. मात्र, पुन्हा जैसे थे अशीच परिस्थिती राहिली आणि पंत अवघ्या 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पंतच्या अशा कामगिरीने सध्या तरी वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच हा खेळाडू टीम इंडियावर ओझे बनल्याचे अनेकांनी म्हटले आहे. (t20 world cup 2022 rishabh pant bad performance team india)

गेल्या 5 सामन्यातील निराशाजनक कामगिरी

ऋषभ पंतसाठी मागील काही टी 20 सामने खूपच वाईट राहिले आहेत. त्याच्या शेवटच्या 5 टी 20 इनिंग्स पाहिल्या तर 31 चेंडूत 44 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळीशिवाय तो कोणत्याही सामन्यात मोठी खेळी खेळला नाही. अलीकडेच द. आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी 20 सामन्यात त्याला ओपनिंगला पाठवण्यात आले. पण त्याला केवळ 27 धावा करता आल्या. पंतच्या शेवटच्या पाच टी 20 मधील धावसंख्या 27, 20, 17, 14, 44 अशी आहे. अशा स्थितीत त्याचा आता वर्ल्ड कप प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करणे संघासाठीच घातक ठरू शकते, असेही अनेकांना वाटते. (t20 world cup 2022 rishabh pant bad performance team india)

सराव सामना जिंकला…

भारताने पहिल्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव केला. पर्थमधील वाका मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने 158 धावांचा यशस्वी बचाव केला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी (6 धावा) घेतले. तर युझवेंद्र चहलने 15 धावांत दोन आणि भुवनेश्वर कुमारनेही 26 धावांत दोन विकेट्स पटकावल्या. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या 52 धावा आणि हार्दिक पंड्याच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे 20 षटकांत 157 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने आठ गड्यांच्या मोबदल्यात 145 धावाच केल्या. (t20 world cup 2022 rishabh pant bad performance team india)

Back to top button